बारावीच्या विद्यार्थ्याची गळफासाने आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 16:38 IST2018-02-19T16:37:08+5:302018-02-19T16:38:06+5:30
पवन नगरातील घटना : चौधरी परिवार सुन्न

बारावीच्या विद्यार्थ्याची गळफासाने आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : बारावीत शिकणाºया विद्यार्थ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली़ रविवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे पवन नगर परिसरातील जनता बँक कॉलनीत शोकाकूल वातावरण निर्माण झाले़
चाळीसगाव रोडवरील पवन नगरात असलेल्या जनता बँक कॉलनीत राहणारा चेतन हरि चौधरी (२६) या तरुणाने रविवारी पहाटेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला़ ही घटना सकाळी उघडकीस आली़ त्याला तातडीने उपचारासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ तेथील डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले़ याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
शहरातील एसएसव्हीपीएस महाविद्यालयात चेतन हा बारावीचे शिक्षण घेत होता़ विशेष म्हणजे २१ फेब्रुवारीपासून बारावीचे पेपर सुरु होत असल्याने त्याचा अभ्यास सुरु होता़ असे असताना त्याने आत्महत्या का केली़ त्यामागे नेमके कोणते कारण असू शकते याबाबत नेमके कारण समजू शकलेले नाही़ त्याच्या मृत्यूमुळे चौधरी परिवार सुन्न झाला असून परिसरात शोकाकूल वातावरण आहे़