शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

साक्रीतील डॉक्टरने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 17:05 IST

कारण गुलदस्त्यात : विषारी औषधाचे इंजेक्शन घेतले

ठळक मुद्देसाक्रीत तरुण डॉक्टराची आत्महत्याघटनेमागचे कारण गुलदस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : शहरातील  २९ वर्षीय एम.डी. डॉ.पराग खैरनार यांनी विषारी औषधाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आल्याने शहरासह तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. असे का घडले असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे.शहरातील नागरिकांना डॉ.डी.डी. खैरनार हे सुपरिचित नाव आहे. ते गेल्या अनेक वर्षापासून शहरात दवाखाना चालवित  वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांचा मुलगा डॉ.पराग खैरनार यांनी एमडी (मेडिसिन) झाल्यानंतर वडलांच्या पाऊलावर पाऊल ठेवीत शहरातच सेवा देण्याचा मानस व्यक्त केला.  त्याप्रमाणे त्यांनी शहरातील महामार्गालगत असलेले डॉ.शिंदे  यांचे हॉस्पीटल भाडेतत्वावर घेतले. २ सप्टेंबर रोजी त्या हॉस्पीटलचा शुभारंभ करण्यात आला. गुरुवारी पहाटे डॉ. पराग  हॉस्पीटलमध्ये पेशंट तपासायचे असे सांगून भाडणे रोडवरील आपल्या राहत्या घरातून कारने निघाले. हॉस्पीटलमध्ये गेल्यानंतर लवकर न परतल्याने हॉस्पीटलमध्ये चौकशी केली असता ते हॉस्पीटलमध्ये आले नसल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली. तेव्हा डॉ.पराग यांची सर्वत्र शोधाशोध सुरु झाली.  तेव्हा शेवाळी गावाजवळ  महामार्गावर बायपास रस्त्यावर ते कारमध्ये मृतावस्थेत आढळून आले. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी साक्री ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. त्यानंतर दुपारी धुळ्यातील शासकीय रुग्णालयात इनकॅमेरा शवविच्छेदन  करण्यात आले. नंतर  मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. नंतर सायंकाळी उशीरा त्यांच्या राहत्या गावी विटाई येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.दोन दिवसात विवाह ठरणार होतामयत डॉ.पराग खैरनार हे अविवाहित होते.  हॉस्पीटल सुरु झाल्यानंतर  ४ आॅक्टोबरला त्यांचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानंतरगणेश चतुर्थीच्या दोन दिवसानंतर त्यांचा विवाह ठरणार होता. त्यांची होणारी पत्नी सुद्धा एम.डी.(पॅथॉलॉजी) होती. डॉ. पराग यांचा लहान भाऊ नितीन हा कºहाड येथे एम.एस. चा अभ्यास करीत आहे. बहिण एम.बी.बी.एस. झालेली आहे.

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी