न्यायासाठी आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 23:07 IST2019-09-18T23:07:10+5:302019-09-18T23:07:32+5:30

ठेलारी समाज : वनविभागाच्या अधिकाऱ्याकडून समाजावर अन्याय

Suicide attempt for justice | न्यायासाठी आत्मदहनाचा प्रयत्न

dhule

धुळे : वन जमिनीवर अतिक्रमन करणाऱ्यांना पाठीशी घालणाºया वन अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी निवेदन देऊनही न्याय मिळत नसल्याने मेंढपाळ समाज बांधवांतर्फे वनविभाग कार्यालयाबाहेर अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न बुधवारी झाला.
तालुक्यातील हडसूणे गावात वनपाल एस़एस़माळी यांनी चिंतामन ठेलारी या मेंढपाळाला मारहाण केली़ तसेच सरकारी कामात अळथळा आणल्याप्रकरणी खोटी केसही दाखल केली होती़ वन जमिनीवर अतिक्रमण करणाºयांकडून झाडे तोडत असतांना ठेलारीविरोध केल्याने अतिक्रमण धारकांकडून ठेलारी स्त्री-पुरूषांना मारहाण झाली़ याबाबत वनपाल माळी व पठाण यांच्याकडे तक्रार करून देखील न्याय मिळाला नाही़ त्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न करणाºया रामदास कारंडे, दिनेश सरग, पुंडलिक थोरात, बाळू कोरडकर आदींना ताब्यात घेण्यात आले़

Web Title: Suicide attempt for justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे