उपसंपदकासाठी सूचना - जिल्ह्यात पहिली ते आठवीच्या एकूण ४ लाख ४ हजार ६७१ शाळा आहेत? - शाळा किती आहेत? आणि विद्यार्थी किती आहेत?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:35 IST2021-04-06T04:35:17+5:302021-04-06T04:35:17+5:30
धुळे : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास ...

उपसंपदकासाठी सूचना - जिल्ह्यात पहिली ते आठवीच्या एकूण ४ लाख ४ हजार ६७१ शाळा आहेत? - शाळा किती आहेत? आणि विद्यार्थी किती आहेत?
धुळे : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करून त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र शिक्षण विभागाने नववी ते अकरावीच्या परीक्षांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
जिल्ह्यात पहिली ते आठवीच्या एकूण ४ लाख ४ हजार ६७१ शाळा आहेत, तर ११०४ जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सध्या पहिलीच्या वर्गात ३७ हजार ५३९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. असे पहिली ते आठवीपर्यंत ४ लाख ४ हजार ६७१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नुकतेच शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी आता परीक्षा न देता पुढील वर्गात पास करण्यात येणार आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी शाळा बंद; परंतु शिक्षण सुरू, असा उपक्रम सुरू असून, ऑनलाइन शिक्षण, स्वाध्याय उपक्रम, विविध कार्यक्रम ऑनलाइनच्या माध्यमातून घेतले. या निर्णयाचे संमिश्र स्वागत पालकांकडून हाेत आहे.