ऊसाला २७०० रुपयांचा दर जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 23:38 IST2019-11-30T23:37:25+5:302019-11-30T23:38:05+5:30
शिरपूर : स्थानिक कारखाना बंद, अन्य साखर कारखान्यामुळे शेतकरी होरपळला

Dhule
शिरपूर : तालुक्यातील शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ काही परिसरात या हंगामातील ऊसतोडणी सुरू झाली असून २२५० ते २७०० रूपयापर्यंत भाव देण्याचे जाहिर केले आहे़ सद्यस्थितीत ऊसतोड व वाहतुकीचा सर्व खर्च कारखाना प्रशासन करीत आहे़ गेल्या हंगामात चाळीसगांव येथील बेलगंगा कारखान्याने तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना ऊसाचे पेमेंट उशिरा दिल्यामुळे शेतकरी चांगलाच होरपळला होता. यंदा अद्याप त्या कारखान्याच्या ऊसतोड टोळ्या दाखल झालेल्या नाहीत़
गेल्या ८ वर्षापासून शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना बंद आहे़ बंद काळातही तालुक्यात ऊस लागवड सुरूच आहे़ अद्यापही तालुक्यात ४ ते ५ हजार एकर क्षेत्रात ऊस उभा आहे़ गेल्यावर्षी ऊसतोडणीसाठी मजुराअभावी शेतकरी मेटाकुटीस आला होता़ तालुक्यातील ऊस पुष्पदंतेश्वर, फैजपूर, चोपडा, कन्नड, द्वारकाधीश तसेच खाजगी कानसरींनी नेला होता़ सर्वच कारखान्यांनी वेगवेगळा भाव दिला होता़ गतवर्षी चाळीसगांव येथील बेलगंगा कारखान्याने १९०० ते २ हजार रूपये भाव देवून ऊसतोड केली होती़ मात्र ऊसाचे पेमेंटकरीता शेतकºयांना तब्बल ३-४ महिने थांबावे लागले होते़ काही शेतकरी त्या कारखान्यापर्यंत पोहचल्यानंतर ऊसाचे पेमेंट मिळाले होते़ अद्यापही काही शेतकºयांचे पेमेंट बाकी असल्याचे सांगण्यात आले़
गेल्या आठवड्यात तालुक्यात ऊसतोडणीला सुरूवात झाली़ कन्नड येथील कारखान्याने २४०० रूपये भाव जाहिर करून २१ दिवसानंतर पेमेंट देण्याच्या बोलीवर ऊसतोड स्वखर्चाने करुन ते वाहून नेत आहेत़ द्वारकाधीश कारखाने २५००, पुष्पदंतेश्वर कारखान्याने २३४० रूपये भाव सांगून ऊसतोड करण्यासाठी टोळ्या पाठवून वाहून नेत आहेत़ बडवानी येथील कारखान्याने २२५० रूपये देण्याचे जाहिर केले आहे, मात्र शेतकºयांनी २३५० च्या वर भाव मिळेल तरच ऊस देण्याचे सांगत आहे़ भाव निश्चित न झाल्यामुळे अद्याप त्या कारखान्याने ऊसतोड सुरू केलेली नाही़ नगर जिल्ह्यातील कारखान्यांनी सुध्दा या भागातील शेतकºयांशी संपर्क साधून ऊस घेण्याचे सांगत आहेत़ ते देखील २६०० ते २७०० रूपये भाव देण्याचे सांगत आहेत, मात्र ते ठराविक शेतकºयांचाच ऊस घेवून जातात़ त्यामुळे गतवर्षी शेतकºयांचे हाल होवून नुकसान देखील झाले आहे़ त्यामुळे २-३ वर्षापर्यंत ऊस घेण्याचा करार केला तरच शेतकरी या कारखान्याला ऊस देणार आहे़
शिरपूर-चोपडा मार्गावरील सावेर येथील दत्तकृपा कारखान्याने देखील भाव जाहिर न करता ऊसतोड करून वाहून नेत आहे़ परिसरातील शेतकºयांना अन्य कारखाना जो भाव देईल तो भाव देण्याचे आश्वासन दिले आहे़ त्यामुळे या कारखान्याने २-३ दिवसापासून तालुक्यात ऊसतोड सुरू केली आहे़
गेल्यावर्षी ऊसतोडणीच्या शेवटी-शेवटी शेतकºयांनाच खाजगी टोळी टाकून ऊसतोडणी करून घ्यावी लागली आहे़ त्यापोटी टनामागे मजूर शेतकºयांकडून प्रतिटन ४०० रूपये मोजून घेतले आहेत़ तसेच जेवनाचा डबासह ट्रकचालकांना सुध्दा वेगळा पैसा द्यावा लागला आहे़
होळनांथे, मांजरोद, भोरटेक परिसरातील शेतकरी द्वारकाधीश व कन्नड कारखान्याला ऊस देत आहे़ करवंद व सावळदे परिसरातील शेतकरी पुष्पदंतेश्वर व द्वारकाधीशला ऊस देत आहेत़ तरडी, हिसाळे परिसरातील शेतकरी शहादा येथील पुष्पदंतेश्वर कारखान्याला ऊस देत आहेत़
स्थानिक साखर कारखाना बंद असल्यामुळे तालुक्यातील शेतकरी संभ्रमावस्थेत आहे़ त्यामुळे लवकर ऊस तोडणीसाठी खाजगी टोळ्या उभारून जो भाव मिळेल त्या भावात ऊस तोडणी करीत आहे़