धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सर्व विभागांना अचानक भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 11:44 IST2019-11-20T11:44:13+5:302019-11-20T11:44:29+5:30
कर्मचाऱ्यांकडून जाणून घेतली विभागाची सविस्तर माहिती

धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सर्व विभागांना अचानक भेट
आॅनलाइन लोकमत
धुळे : महिला लोकशाही दिनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी जिल्हाधिकारी गंगाथरन डी.यांनी अचानक सर्व विभागांना भेट देत तेथील कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हाधिकाºयांच्या ‘सरप्राईज व्हिजीट’मध्ये कर्मचाºयांमध्ये धांदल उडाली होती.
महिला लोकशाही दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी जिल्हाधिकारी डी.गंगाथरण हे आपल्या दालनाच्या बाहेर आलेत. कर्मचाºयांना वाटले ते कामानिमित्त कुठे बाहेर जात असतील. मात्र त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांचे दालनासमोर असलेल्या महसूल विभागाला भेट दिली. यावेळी तेथे सर्व कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी शेजारी असलेल्या सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी उन्मेश महाजन यांच्या दालनाला भेट दिली. यावेळी प्रशासकीय कामकाजाचा आढावा त्यांच्याकडून घेतला. त्यानंतर समोर असलेल्या जिल्हा विज्ञान व तंत्रज्ञान विभागा (एनआयसी)ला भेट दिली. तेथे जिल्हा विज्ञान व तंत्रज्ञान अधिकारी खडसे यांनी त्यांना माहिती दिली. यानंतर तिसºया मजल्यावरील भूसंपाद विभागात जावून त्यांनी कर्मचाºयांची माहिती घेतली. यावेळी उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर उपस्थित होते. जिल्हाधिकाºयांच्या सरप्राईज व्हीजिटमुळे कर्मचाºयांमध्ये काहीसे भितीचे वातावरण तयार झाले होते. मात्र नियमित भेट असल्याचे समजल्याने कर्मचाºयांनी सुटकेचा श्वास सोडला.धुळे जिल्हाधिकाºयांनी दिली सर्व विभागांना अचानक भेट
कर्मचाºयांकडून जाणून घेतली विभागाची सविस्तर माहिती
आॅनलाइन लोकमत
धुळे : महिला लोकशाही दिनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी जिल्हाधिकारी गंगाथरन डी.यांनी अचानक सर्व विभागांना भेट देत तेथील कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हाधिकाºयांच्या ‘सरप्राईज व्हिजीट’मध्ये कर्मचाºयांमध्ये धांदल उडाली होती.
महिला लोकशाही दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी जिल्हाधिकारी डी.गंगाथरण हे आपल्या दालनाच्या बाहेर आलेत. कर्मचाºयांना वाटले ते कामानिमित्त कुठे बाहेर जात असतील. मात्र त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांचे दालनासमोर असलेल्या महसूल विभागाला भेट दिली. यावेळी तेथे सर्व कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी शेजारी असलेल्या सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी उन्मेश महाजन यांच्या दालनाला भेट दिली. यावेळी प्रशासकीय कामकाजाचा आढावा त्यांच्याकडून घेतला. त्यानंतर समोर असलेल्या जिल्हा विज्ञान व तंत्रज्ञान विभागा (एनआयसी)ला भेट दिली. तेथे जिल्हा विज्ञान व तंत्रज्ञान अधिकारी खडसे यांनी त्यांना माहिती दिली. यानंतर तिसºया मजल्यावरील भूसंपाद विभागात जावून त्यांनी कर्मचाºयांची माहिती घेतली. यावेळी उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर उपस्थित होते. जिल्हाधिकाºयांच्या सरप्राईज व्हीजिटमुळे कर्मचाºयांमध्ये काहीसे भितीचे वातावरण तयार झाले होते. मात्र नियमित भेट असल्याचे समजल्याने कर्मचाºयांनी सुटकेचा श्वास सोडला.