पानटपरीवर उदरनिर्वाह, मुलांच्या शिक्षणाची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 22:20 IST2020-08-09T22:19:52+5:302020-08-09T22:20:11+5:30
पानटपरी व्यावसायिक : शिंदखेड्यातील उच्च शिक्षित भावंडे लॉकडाऊनमुळे अडचणीत

पानटपरीवर उदरनिर्वाह, मुलांच्या शिक्षणाची चिंता
शिंदखेडा : कोरोनाने अनेक व्यासायाचे कंबरडे मोडले असून त्यात अनेकांच्या व्यवसाय बंद असल्याने घर कसे चालवावे व मुलाचे पुढील शिक्षण कसे करावे हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे असाच येथील कचेरी चौकातील आनंद पान सेंटर चे धनराज डांगे व किरण डांगे हे दोन्ही बंधू गेल्या २८ ते ३० वषार्पासून पानटपरीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत आहेत़
दोन्हीही उच्च शिक्षित असून नोकरी नसल्याने दोघांनी मिळून हा व्यवसाय सुरू केला़ त्यात त्यांचे खान्यापिण्यासह मुलांच्या उच्च शिक्षणा साठी लागणारा खर्च भागत होता़ मात्र गेल्या ४ महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मुळे व्यवसाय बंद झाल्याने आणि मुलगा वैद्यकीय शिक्षण एमबीबीएस करीत असल्याने त्याला दर महिन्याला लागणारा खर्च हा नातेवाईक व इतरांकडून पैसे उभे करून पाठवत आहे़ तसेच पान व्यावसाय पूर्णपणे बंद झाल्याने उदारनिर्वाहासाठी त्यांनी टपरीतच मिनरल वॉटर, तसेच कोल्ड्रिंग सुरू केले आहे़ त्यावरच सद्या घराचा किराणा थोड्याफार प्रमाणात सुरू असल्याचे सांगितले़ शिंदखेडा येथील कचेरी चौकात आनंद पानसेंटर नावाची टपरी किरण भगवान डांगे व धनराज भगवान डांगे यांची आहे़ दोघेही उच्च शिक्षित असून नोकरीसाठी डोनेशन साठी पैसे नसल्याने दोघांनी हा व्यवसाय पत्करला़ किरण डांगे याचे बीएबीएड इंग्रजी विषयात शिक्षण झाले असून शिक्षकाची नोकरी साठी डोनेशन नसल्याने तसेच भाऊ धनराज डांगे याचे शिक्षण बारावी आयटीआय डिझेल मॅकेनिकमध्ये शिक्षण झाले आहे़ तो पुणे येथे नोकरीला ही लागला होता़ मात्र तुटपुंज्या पगारावर शहरात भागत नसल्याने तोही घरी आल्याने वडीलांचे टेंशन वाढले़ त्यात वडील ही शिंदखेडा तहसील मध्ये शिपाई म्हणून कामाला होते़ तेही सेवानिवृत्त झाले होते़ जी काही पेंशन होती त्यात भागत नसल्याने किरण व धनराज या दोन्ही भावांनी तहसील जवळील चौकात पानटपरी चालवण्याचा व्यवसाय सुरु केला़ गेल्या २५ वर्षांपासून व्यवसाय सुरु आहे़ व्यवसायातून त्यांना दरमहिन्याला १० हजारापर्यंत रक्कम मिळत होती़ त्यात सुरळीत सुरु होते़ पण, आता लॉकडाऊनमुळे व्यवसाय थांबलेला असून घर कसे चालवायचे हा प्रश्नच आहे़
लॉकडाऊनच्या अगोदर सर्व काही सुरळीत सुरु होते़ पुरेसे पैसे मिळत असल्याने घरासह मुलांचा खर्च भागत होता़ आता जेमतेम परिस्थिती असून नव्याने संकट उभे राहिलेले आहे़ - किरण डांगे, शिंदखेडा