टीव्ही पाहू न दिल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

By Admin | Updated: January 15, 2015 15:06 IST2015-01-15T14:59:45+5:302015-01-15T15:06:14+5:30

टीव्ही बघताना वडील रागावल्याने बहिणाबाई कॉलनी भागातील एका अल्पवयीन लेकीने बुधवारी संध्याकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली.

Student's suicide due to non-TV viewing | टीव्ही पाहू न दिल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

टीव्ही पाहू न दिल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

जळगाव : टीव्ही बघताना वडील रागावल्याने बहिणाबाई कॉलनी भागातील एका अल्पवयीन लेकीने बुधवारी संध्याकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. चार दिवसातील ही चौथी घटना आहे. आसोदा रस्ता भागात मजूर कुटुंबातील मुलगी टीव्ही पाहात बसली होती. वडील रागावल्याने दोघांमध्ये वाद झाला. संतप्त मुलीने मागच्या खोलीत पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार काही वेळानंतर लक्षात आला. सोमवारी मोहाडी येथील विद्यार्थिनीने, तर नवृत्तीनगरातील तरुणाने आत्महत्या, मंगळवारी दीक्षितवाडीतील आठवीच्या विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

-------------

चौथी घटना : घरातच घेतला गळफास

'ती' अत्यवस्थ मंगळवारी दीक्षितवाडीतील विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. 

Web Title: Student's suicide due to non-TV viewing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.