जिल्ह्यात विद्यार्थी-विद्यार्थिनी बनले 'स्वच्छतादूत'
By Admin | Updated: November 20, 2014 13:38 IST2014-11-20T13:38:20+5:302014-11-20T13:38:20+5:30
जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानात शासकीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले असून सर्वत्र स्वच्छतेचा जागर सुरू आहे.

जिल्ह्यात विद्यार्थी-विद्यार्थिनी बनले 'स्वच्छतादूत'
धुळे : जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानात शासकीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले असून सर्वत्र स्वच्छतेचा जागर सुरू आहे. एकंदरीत विद्यार्थी 'स्वच्छतादूत' बनल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
रंधे कन्या विद्यालय
शिरपूर येथील सावित्रीताई व्यंकटराव रंधे कन्या विद्यालयातील स्काऊट-गाईडच्या विद्यार्थिनींनी येथील बसस्थानक व परिसरात स्वच्छता मोहीम राबविली.
या वेळी शाळेच्या प्राचार्या मंगला पावरा, आगारप्रमुख प्रदीप पावरा, सारिका रंधे, जिल्हा सहायक कमिशनर संध्या जगदेव, एस.आर. पातुरकर यांच्यासह गाईडच्या विद्यार्थिनी वैष्णवी संजय पाटील, कृतिका भावसार, निकिशा माळी, साधना चव्हाण, हर्षाली शिरसाठ, मानसी मेटकर, जान्हवी वासनिक, ज्योती पावरा, काजल सूर्यवंशी, मोहिनी गव्हाणे, अर्चना पावरा आदींनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. दरम्यान, शाळेत सप्ताहांतर्गत बालगीत, वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य, स्वच्छतेविषयक व्याख्याने आदी उपक्रम पार पडले. विद्यार्थिनींमध्ये श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन, सामाजिक बांधिलकी आदी मूल्यांची रुजवात व्हावी या दृष्टीने शाळेमार्फत उपक्रम हाती घेतले जात आहेत.
शांताई एज्युकेशन सोसायटी
पिंपळनेर येथील शांताई एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकांनी स्वच्छता मोहीम राबविली. तसेच सप्ताहांतर्गत ए.पी. मेने यांनी स्वच्छ व संतुलित आहार या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच पी.डी. मोरे यांनी वैयक्तिक स्वच्छतेवर, व्ही.आर. बेनुस्कर यांनी स्वच्छ पाणी, तर वाय.के. सोनवणे यांनी स्वच्छतागृहाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख डी.डी. दळवेलकर यांनी केले.
दातर्ती विद्यालय
साक्री तालुक्यातील दातर्ती येथील ज्ञानप्रबोधिनी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी स्वच्छता मोहीम राबविली. या वेळी मुख्याध्यापिका एस.पी. गायकवाड, उपशिक्षक आर.डी. खैरनार, एस.बी. काकुळते आदी उपस्थित होते.दरम्यान, सप्ताहांतर्गत विविध उपक्रम सुरू आहेत.
जी.एन. पाटील कन्या हायस्कूल
धुळे तालुक्यातील शिरुड येथील जी.एन. पाटील कन्या हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबविली. सप्ताहांतर्गत संतुलित आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शाळेतील वर्गखोल्या, किचन शेड, पाण्याच्या टाक्या, संगणक दालनाची सफाई करण्यात आली. कार्यक्रमास मुख्याध्यापिका व्ही.एस.साळुंखे व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.
कुंडाणे जि.प. मराठी शाळा
धुळे तालुक्यातील कुंडाणे (वरखेडे) येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सप्ताहांतर्गत विद्यार्थ्यांना हात धुण्याच्या दहा पद्धतीबाबत भारती गवळे यांनी मार्गदर्शन केले. दुसरी ते चौथीच्या विद्यार्थिनींसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. तसेच बालस्वच्छता व आरोग्य या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोरख पाटील, ग्रा.पं. सदस्य समाधान पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.वर्गखोल्या, परिसराची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत सरपंच गोरख पाटील, समाधान पाटील, गंगाराम पाटील, ग्रामसेवक भदाणे, पाणीपुरवठा कर्मचारी राजू पाटील, सुरेश पाटील, मुख्याध्यापक रामराव पाटील, शिक्षक, विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी रामराव पाटील, संगीता पाटील, वर्षाराणी कचवे, भारती गवळे, दिलीप सोनवणे, राजसबाई पाटील यांनी परिश्रम घेतले.
धुळे तालुक्यातील अवधान येथील अहिल्यादेवी विद्यालयात स्वच्छता सप्ताहांतर्गत माता-पालक सभा घेण्यात आली. शालेय आरोग्य तपासणीसह हात धुवा उपक्रम घेण्यात आला. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश जाधव यांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी.एम. अहिरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक आर.जी.मोरे, पी.एस.पाटील, किरण पाटील, मीनाक्षी मोरे, माता-पालक संघाचे अध्यक्ष एन.डी. पाटील उपस्थित होते.प्रास्ताविक डी.जे.पाटील यांनी केले. सूत्रसंचालन आर.एस. बोरसे यांनी केले.आभार बी.एस.पाटील यांनी मानले.