विद्यार्थ्यांनी घडविले मराठी संस्कृतीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 12:55 IST2020-03-01T12:54:44+5:302020-03-01T12:55:14+5:30
शिरपूर । डॉ.विजयराव रंधे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : येथील किसान विद्या प्रसारक संस्था संचालित डॉ़विजयराव रंधे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये कवी कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर यांचा जन्म दिवस हा दिवस मराठी राजभाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे समन्वयक प्रा़जी़व्ही़ पाटील होते. दीपप्रज्वलन प्राचार्य सारिका ततार व कामिनी पाटील यांच्याहस्ते करण्यात आले़ इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी ‘मी मराठी’ या गाण्यावर नृत्य सादर करीत मराठी संस्कृतीचे दर्शन घडविले.
अलिकडे लहानांपासून तर तरुण- तरुणींपर्यंत साऱ्यांनाच मोबाईलचे वेड लागले आहे. त्यावर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी मुकनाट्य सादर करुन मोबाईलचा कसा योग्य वापर करावा, हे दाखवून दिले. तसेच पाणी साठवण विषयावरही मूकनाट्य सादर केले.
भारुड, पोवाडा, मराठी गीते, यातून मराठी संस्कृती व स्वच्छतेचा संदेश दिला. मराठी साहित्य या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली़ मराठी भाषा ही अमृतात पैजा जिंकणारी श्रेष्ठ भाषा आहे, असे प्रतिपादन प्रा़जी़व्ही़ पाटील यांनी केले. संजोती पाटील, स्वाती जामदार यांनी मराठी भाषेचे महत्व विशद केले. यावेळी मराठी साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले. सर्व स्पर्धांचे परीक्षण शितल चव्हाण, राहुल राजपूत यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठी विभाग प्रमुख प्रमोद पाटील, पुष्पा राठोड, स्वाती जामदार, स्वाती चव्हाण, मंजिरी पिंगळे, गायत्री शिंपी, रीना मित्तल, कल्याणी चौधरी, पवित्रा राजपूत यांनी प्रयत्न केले. फलक लेखन धनश्री धाकड, शितल चव्हाण, रिद्वाना शेख यांनी केले. सुत्रसंचालन दिपाली वाघ तर आभार प्रदर्शन वंदना पाटकरी यांनी केले.