विद्यार्थिनींचा पोलीस ठाण्यात ‘ठिय्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 12:36 IST2019-07-25T12:36:05+5:302019-07-25T12:36:46+5:30

बसप्रवासात टोमणे, छेडखानी : जबाबदार असलेल्या मुलांसह त्यांच्या पालकांना बोलवून तंबी

Students 'cops' at police station | विद्यार्थिनींचा पोलीस ठाण्यात ‘ठिय्या’

विद्यार्थिनींचा पोलीस ठाण्यात ‘ठिय्या’

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : तालुक्यातील टेंभे बु़ येथील शाळकरी मुले बसमध्ये मुलींची छेडछाड करून गैरवर्तन करतात, अश्लिल भाषेत मुलींना टोमणे मारतात या त्रासाला कंटाळून भरवाडे येथील  ४०-५० शाळकरी मुलींनी सकाळी ९ ते दुपारी १़३० वाजेपर्यंत शिरपूर पोलिस ठाण्याच्या आवारात बसून होते़ अखेर पोनि शिवाजी बुधवंत यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मुली गावी परतल्यात़
२४ रोजी सकाळी ९ वाजेपासून भरवाडे गावातील शाळकरी मुलींसह त्यांचे पालक पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेत़ मात्र तत्पूर्वी, पोनि शिवाजी बुधवंत हे नरडाणा येथे बंदोबस्तकामी रवाना झाल्यामुळे तोपर्यंत त्या मुली पोलिस ठाण्याच्या प्रांगणात एका लिंबाच्या झाडाखाली बसून होते़ तेथेच त्यांना नाश्ता म्हणून पोहे देण्यात आले़ 
भरवाडे येथील शाळकरी मुले-मुली टेकवाडे-शिरपूर बसने अर्थे गावी शिक्षणासाठी ये-जा करतात़ या बसमध्ये टेंभे बु़ येथील मुले-मुली देखील शिक्षणासाठी अर्थे गावी जात असतात़ दरम्यान, टेंभे बु़ येथील काही शाळकरीत मुले भरवाडे येथील मुलींची छेडछाड करतात, त्यांच्याशी गैरवर्तन करून अश्लिल भाषेत टोमणे मारतात असे प्रकार वारंवार घडत होते़
२३ रोजी सकाळी ७़३० वाजेच्या सुमारास सुध्दा भरवाडे येथील मुली अर्थे गावी जाण्यासाठी बसमध्ये बसले असतांना ते मुले छेडछाड करून अश्लिल हावभाव करून त्रास देत होते़ सदरची बाब मुलींच्या पालकांना कळताच त्यांनी धाव घेतली़ त्यांच्यात वाद देखील झाला़ दरम्यान, टेंभे बु़ येथील काही तरूणांनी या संदर्भात पोलिस ठाण्यात अर्ज दिला़ त्याची काणकूण त्या मुलींच्या पालकांना कळाली़
वारंवार त्रासाला कंटाळून २४ रोजी भरवाडे गावातील ४०-५० मुलींनी सकाळी शाळेत न जाता थेट पोलिस ठाणे गाठून ठिय्या आंदोलन केले़ दरम्यान, पोनि बुधवंत हे पोलिस बंदोबस्तकामी नरडाणा येथे गेल्यामुळे या मुलींची आपबिती कुणीच ऐकून घ्यायाला तयार नव्हते़ त्यामुळे पोलिस ठाण्याच्या आवारातील एका लिंबाच्या झाडाखाली बसून राहीलेत़ दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्या मुलींना भुक लागल्यामुळे नाश्ताची सोय केली़
दुपारी १़३० वाजेच्या सुमारास पोनि बुधवंत आल्यानंतर त्यांनी मुलींची आपबिती ऐकून घेतल्यानंतर त्या मुलांसह त्यांच्या पालकांना देखील पोलीस ठाण्यात बोलावून खडसावले तसेच चांगलेच फैलावर घेतले. 

Web Title: Students 'cops' at police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे