कोरोना महामारीच्या काळातही शास्तीच्या सवलतीसाठी झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:35 IST2021-07-29T04:35:38+5:302021-07-29T04:35:38+5:30

शास्ती माफीचा निर्णय मालमत्ताकर वेळेत न भरल्यास मार्च महिन्यानंतर दरमहा दोन टक्के शास्ती आकारली जाते. शास्तीची रक्कम टप्प्याने वाढल्याने ...

Struggling for punishment relief even during the Corona epidemic | कोरोना महामारीच्या काळातही शास्तीच्या सवलतीसाठी झुंबड

कोरोना महामारीच्या काळातही शास्तीच्या सवलतीसाठी झुंबड

शास्ती माफीचा निर्णय

मालमत्ताकर वेळेत न भरल्यास मार्च महिन्यानंतर दरमहा दोन टक्के शास्ती आकारली जाते. शास्तीची रक्कम टप्प्याने वाढल्याने अनेकांनी मालमत्ताकर भरलेला नाही. त्यामुळे महापालिकेतर्फे १ ऑगस्टला लोकअदालत होणार आहे. यावेळी थकबाकीवरील शास्ती माफ केली जाणार आहे. कराचा भरणा करण्यासाठी नागरिकांना ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे

मालमत्तांचे सर्वेक्षण

महापालिकेच्या हद्दीत दहा गावांचा समावेश झाला आहे. या गावातील मालमत्ताधारकांना अद्याप महापालिकेने नवीन दरानुसार कर आकारणी सुरू केलेली नाही. सर्व गावातील मालमत्तांचे सर्वेक्षण झाले आहे. त्याचा संगणकिकृत डाटाही तयार झाला आहे. त्यामुळे या भागातील मालमत्ताधारकांकडून आगामी काळात नवीन दरानुसार कर वसूल होणार आहे.

एक लाखावर मालमत्ता

शहराचा चौफेर विस्तार होत असल्याने मालमत्ता धारक वाढले. अनेकांनी जुने बांधकाम पाडून नवीन बांधकाम केले आहे. तसेच महापालिकेचे क्षेत्रफळ वाढून १०१ चौरस किलोमीटर झाले आहे. या क्षेत्रात १ लाख ३५ हजार मालमत्ता आहे. तसेच मालमत्ता करापोटी ७६ कोटी रुपये थकले आहेत. त्यात २५ कोटी रुपये शास्ती आहे. ही रक्कम वसूल झाली तर शहरात विकास कामे करण्याचा मार्ग काही प्रमाणात का होईना मोकळा होणार आहे.

तर जप्तीची नोटीस

नोटीस बजावल्यानंतरही जर थकबाकीदारांनी मालमत्ताकर भरला नाही तर संबंधितांना आगामी काळात मालमत्ता जप्तीच्या नोटीस देण्यात येतील. त्यानंतर नियमाप्रमाणे जप्तीची कारवाई करण्यात येईल.

Web Title: Struggling for punishment relief even during the Corona epidemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.