काेळी समाजाला जातवैधता मिळेपर्यत संघर्ष सुरूच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:41 IST2021-08-17T04:41:11+5:302021-08-17T04:41:11+5:30
हुतात्मा भटू कुवर यांना वडाळीसह विरदेल व दोंडाईचा येथे आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी जमातीच्यावतीने प्रतीमा पूजन ...

काेळी समाजाला जातवैधता मिळेपर्यत संघर्ष सुरूच राहणार
हुतात्मा भटू कुवर यांना वडाळीसह विरदेल व दोंडाईचा येथे आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी जमातीच्यावतीने प्रतीमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी हुतात्मा कुवर यांचे मोठे बंधू दशरथ कुवर, पत्नी भावना कुवर, मुलगा किरण कुवर, मुलगी, जावईसह, भास्कर कुवर, वासुदेव चित्ते, नरेंद्र निकम, राजधर कोळी, जगन शिरसाठ, किरण सावळे, गणेश कुवर, संजय मगरे, सुनील मगरे, हेमंत सूर्यवंशी उपस्थित होते. १० रोजी हुतात्मा भटू कुवर यांच्या गावी वडाळी येथे शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत हुतात्मा भटू कुवर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील कोळी वाडा येथे हुतात्मा भटू कुवर यांची प्रतिमा पूजन करण्यात आली.
यावेळी मनोगत व्यक्त करताना शानाभाऊ सोनवणे म्हणाले की, हुतात्मा भटू कुवर हे माझे प्रेरणास्थान होते. जोपर्यंत आपल्या टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी जमातीवर होत असलेला अन्याय दूर होत नाही तोपर्यंत माझा संघर्ष चालूच राहील आणि ज्या दिवशी इतर आदिवासीप्रमाणे सुटसुटीत पध्दतीने जमातीचे दाखले व वैधता प्रमाणपत्र मिळतील त्याच दिवशी भटू कुवर यांना बलिदानाची खऱ्या अर्थाने श्रध्दांजली अर्पण होईल असे सांगितले.