महामार्गावर चक्क मातीचा भराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 10:36 PM2019-11-16T22:36:34+5:302019-11-16T22:37:25+5:30

अपघाताचे वाढते प्रमाण : थातूरमातूर अजब उपायांमुळे वाहनधारकांच्या तीव्र प्रतिक्रिया

 Strong soil filler on the highway | महामार्गावर चक्क मातीचा भराव

Dhule

Next

नेर : सुरत- नागपुर या राष्टÑीय महामार्ग क्र.६ वर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे चालकांना अक्षरश: कसरत करीत वाहन चालवावे लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळे महामार्गाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे संबंधित विभागाकडून महामार्गावर मातीचा भराव टाकून थातूरमातूर दुरुस्ती केली जात आहे. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे.
राष्टÑीय महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने महामार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी वारंवार निवेदने देऊन आंदोलने होत आहेत. या कामाची दखल घेत भारतीय महामार्ग प्राधिकरण विभागाने नुकतीच महामार्गावरील खड्डे दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपये खर्चाची निविदा काढली होती. सदर कामाला सुरुवात कधी होईल, याची सर्वांनाच प्रतीक्षा लागून आहे. मात्र, विविध कारणे सांगून हे काम थांबविण्यात आले असून राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
दरम्यान, महामार्गावरील खड्ड्यांमुळे दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावरील खड्डे लवकरात लवकर बुजवून रस्त्याच्या कडेला असलेल्या धोकेदायक साईडपट्ट्यांची दुरुस्ती करणे जरुरीचे आहे.
वाहनचालकांमध्ये होतात वाद
वाहन चालकांना खड्डे टाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. मातीचा भराव टाकल्याने वाहनचालकांचा अंदाज चुकतो खड्डे टाळतांना समोरासमोर वाहने येऊन चालकांमध्ये वादविवाद होऊन प्रसंगी हाणामारीच्या घटनाही घडतात. अपघातात दुर्घटना झाल्यास तर त्याला जबाबदार कोण, असा सवालव् वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे. परंतू संबंधित विभागास याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
सुरत-नागपूर या महामार्गावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते. यात लोकप्रतिनीधी, शासकिय अधिकारी यांच्या वाहनासह अवजड वाहने, एस.टी. बस, प्रवासी वाहनांची मोठी वर्दळ असते. हा महामार्ग मध्यवर्ती ठिकाण असल्याने औरंगाबाद, जळगाव, नागपूर, अमरावती, सुरत, अहमदाबाद आदी महत्त्वाच्या ठिकाणांहून अवजड वाहने धावत असतात. तसेच हा महामार्ग महाराष्ट्र गुजरात राज्याला जोडणारा असल्याने व्यापार व अन्य कामांसाठी प्रवासी या महामार्गावरून प्रवास करतात. खड्ड्यांमुळे येथे धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने अनेकांना श्वसनाचे आजार जडत आहेत.
त्यात महामार्गावरील खड्डयांवर मातीचा भराव टाकण्यात आल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या महामार्गाची व धोकेदायक साईडपट्ट्यांची योग्य रितीने दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून होत आहे.

Web Title:  Strong soil filler on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे