आॅनलाइन लोकमतधुळे : रमाई आवास योजनेंतर्गत घरकूल मंजुरीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियातर्फे सोमवारी समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त हर्षदा बडगुजर यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यात अनेक लाभार्थी सहभागी झाले होते. अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील गोरगरिबांनी रमाई आवास योजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी अनुदान मंजूर करावे यासाठी लाभार्थ्यांनी धुळे महानगरपालिकेकडे अनेक वर्षांपासून अर्ज केले आहेत. मे महिन्यात आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २०११-१२ व २०१७-१८ या वर्षाकरिता लाभार्थींच्या यादीला अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र संबंधित अधिकाºयाची स्वाक्षरी झाल्याशिवाय लाभार्थ्यांना घरकूल मंजुरीची कार्यवाही मनपा प्रशासन करण्यास तयार नाही. त्यामुळे घरकूल योजनेपासून अनेकजण वंचीत आहेत. समाज कल्याण विभागाच्या अधिकाºयांनी यातून मार्ग काढावा यासाठी रिपाईतर्फे आज ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाने समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त हर्षदा बडगुजर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तसेच त्यांना निवेदन देण्यात आले. येत्या दोन दिवसात बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी आरपीआयचे महाराष्टÑ प्रदेश उपाध्यक्ष वाल्मिक दामोदर, शकील शेख अहमद, प्रभाकर खंडारे, राजू शिरसाठ, महेंद्र महाले, सागर ढिवरे, रमाकांत पानतावणे, रामचंद्र शिंदे, राजू शिरसाठ, रवींद्र शिरसाठ, सागर मोरे, यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. ब
धुळे येथे घरकुल मंजुरीसाठी आरपीआयतर्फे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 17:38 IST
समाजकल्याण विभागाच्या अधिकाºयांना दिले निवेदन
धुळे येथे घरकुल मंजुरीसाठी आरपीआयतर्फे ठिय्या आंदोलन
ठळक मुद्देघरकुलच्या अंतिम यादीस मंजुरीअधिकाºयांची स्वाक्षरी नसल्याने अनेकजण वंचीतदोन दिवसात बैठक घेण्याचे आश्वासन