मास्क न वापरणाऱ्यांवर सक्त कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 12:10 IST2020-08-09T12:10:29+5:302020-08-09T12:10:44+5:30
निजामपूर । ग्रा.पं.च्या बैठकीतील निर्णय, त्रास जाणवताच स्वत:च तपासणी करण्याचे आवाहन

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
निजामपूर : निजामपूर व जैताणे गावात मास्क न वापरणाऱ्यांवर सक्त भूमिका घेत दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना शनिवारी झालेल्या तातडीच्या बैठकीत चर्चेनंतर ग्राम पालिकेने दिल्या आहेत.पोलिसांनी देखील पूर्ण सहकायार्चे आश्वासन दिले आहे.
कोरोना संसर्ग अहवालात निजामपूर, जैताणे येथे दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाबाधित रुग्णसंख्या पाहता शनिवारी दुपारी ग्रामपालिकेत झालेल्या बैठकीत कठोर उपाय योजना करण्याविषयी चर्चा झाली. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापर होत नसल्याबद्दल चर्चेत विशेष चिंता व्यक्त झाली. गत वेळेच्या बैठकीनंतर साक्री तहसीलदारांनी स्वत: फिरून मास्क न वापरणाºयांना दंड ठोठावले होते. ते गेले आणि ग्रामस्थ व दुकानदार बिनधास्त झाल्याचे ग्रामविकास अधिकारी यांनी निदर्शनास आणून दिले.
शुक्रवारी जे दोघे तरुण पॉझिटिव्ह आले ते टेस्ट साठी स्वत: गेले असल्याचे कौतुक डॉ. अमोल पवार यांनी बैठकीत बोलून दाखविली.येथील स्थानिक डॉक्टरांचे देखील सहकार्य मिळत आहे. शुक्रवारी त्यांनी ५ जणांना तपासणीसाठी त्यांचेकडे पाठविल्याचेही नमूद केले. वेळीच तपासणी झाली तर रुग्णास धुळे येथे पाठविण्याची वेळ येणार नाही.भाडणे येथे ठेवले जाईल.भाडणे येथे अपवाद वगळता चांगली सोय असल्याचे डॉ. पवार म्हणाले.
बैठकीस पंचायत समिती सदस्य सतीश राणे, जैताणे पंचायत समिती सदस्य अशोक मुजगे, निजामपूरचे एपीआय सचिन शिरसाठ, ग्रामविकास अधिकारी पी.बी. मोराणे, जैताणे पीएचसीचे डॉ. अमोल पवार, डॉ.सपना महाले, डॉ.अभिषेक देवरे, आरोग्य केंद्राचे प्रवीण सोनार, ताहीर बेग मिर्झा, हर्षद गांधी, ग्रामपालिका कर्मचारी आदी होते.
ग्रामपालिका ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी यांनी दररोज सकाळी व दुपारी गावात फिरून दुकाने व रस्त्यावर मास्क न बांधता कुणीही आढळले तर कुणाची ही मुलाहिजा न बाळगता दंड ठोठावला जावा असे ठरले. म्हणजे त्यापुढे ते काळजी घेतील असा उद्देश असेल.दुकानांची वेळ निर्देशानुसार राहणार आल्याचे ठरले.