फागणे येथे तणावपूर्ण शांतता

By Admin | Updated: January 10, 2017 23:51 IST2017-01-10T23:51:45+5:302017-01-10T23:51:45+5:30

फागणे गावात सोमवारी झालेल्या हाणामारी प्रकरणातील संशयितांचा शोध मंगळवारी घेण्याचे काम तालुका पोलिसांचे सुरु होत़े याप्रकरणी कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही़

Stressful peace at the blows | फागणे येथे तणावपूर्ण शांतता

फागणे येथे तणावपूर्ण शांतता

धुळे : तालुक्यातील फागणे गावात सोमवारी झालेल्या हाणामारी प्रकरणातील संशयितांचा शोध मंगळवारी सायंकाळी उशिरार्पयत घेण्याचे काम धुळे तालुका पोलिसांचे सुरु होत़े दरम्यान, याप्रकरणी कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही़

जेवण्याच्या ठिकाणी रविवारी झालेल्या वादाचे पडसाद सोमवारी दुपारी धुळे तालुक्यातील फागणे गावात उमटले होत़े दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती़ यात सर्रासपणे लाठ?ा काठ?ासह तलवारीचाही वापर करण्यात आला़ या हाणामारीत चौघांना दुखापत झाली होती़ त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ याप्रकरणाची फिर्याद धुळे तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आह़े त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आह़े

Web Title: Stressful peace at the blows