रस्त्यावर अतिक्रमण; वाहतुकीवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 23:08 IST2019-11-04T23:08:02+5:302019-11-04T23:08:41+5:30
महापालिका : हॉकर्स झोनचा प्रश्न प्रलंबित, धुळेकरांना वाहतुकीचे डोकेदुखी

dhule
धुळे : मु्ख्य रस्त्यांवर फेरीवाले, हॉकर्स व विक्रेत्यांनी अतिक्रमन केल्याने शहरातील प्रमुख रस्ते सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले आहेत़ मनपा व वाहतूक शाखेच्या लगर्जीपणाने धुळेकरांना मात्र वाहतूक समस्यांना सामोरे जावे लागत आहे़
महापालिकेने हॉकर्स झोनच्या प्रश्नावर चर्चा होऊन पाच जागा निश्चित करण्यात आल्या होत्या़ मात्र हॉकर्स झोनच्या प्रश्नाबाबत ठोस कार्यवाही होत नसल्याने शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर हॉकर्सची संख्या वाढली आहे़ शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत पाच जागा निश्चित करण्यात आल्या होत्या़ त्यात साक्रीरोड वरील हॉकर्ससाठी मनपा शाळा क्रमांक १४, नकाणे रोड-जयहिंद कॉलनी व परिसरातील हॉकर्ससाठी आनंद नगरातील महापालिकेचा भुखंड, इंदिरा उद्यान परिसरातील फळ विके्रते व अन्य हॉकर्ससाठी, इंदिरा उद्यानामागील बोळ, दत्तमंदिर परिसरातील हॉकर्ससाठी नवरंग जलकुंभाशेजारील जागेऐवजी सुदर्शन कॉलनी येथील मोकळी जागा आणि मोहाडी परिसरातील हॉकर्ससाठी दसेरा मैदानाची जागा निश्चिती झाली होती़ मात्र त्यानंतर याची अंमलबजावणी झालीच नाही. त्यामुळे हॉकर्स झोनचा प्रश्न अद्याप मार्गी लागू शकला नाही़
जागा उपलब्ध करून न दिल्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे़ ते महापालिकेचे दैनदिन बाजार शुल्क भरण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे दरवर्षी मनपाच्या बाजार समिती विभागाला आर्थिक नुकसान सहन करावे लागते़ हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी न लागण्याने शहरातील इलेक्ट्रीक खांब, झाडांच्या आधाराने अतिक्रमण करून केले़ सकाळी ७.३०, ११.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत शाळा सुटण्याच्या कालावधीत आग्रारोड, पारोळारोड, जयहिंद चौक, दत्त मंदिरसह व अन्य काही मुख्य रस्त्यावर कायमस्वरूपी वाहतूकीची कोंडी होते़ मात्र मनपा व वाहतूक शाखा वाहतूकीचा प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरत आहे़