पोट चारी दुरुस्त करून पाण्याचा अपव्यय थांबवला, शेतकऱ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:25 IST2021-07-18T04:25:52+5:302021-07-18T04:25:52+5:30
न्याहळोद येथे धुळे रस्त्यालगत असलेल्या भगवान जिरे यांच्या शेत जमिनीजवळ गेल्या वर्षाच्या पावसाळ्यात पोट चारी फुटली होती. ही बाब ...

पोट चारी दुरुस्त करून पाण्याचा अपव्यय थांबवला, शेतकऱ्यांना दिलासा
न्याहळोद येथे धुळे रस्त्यालगत असलेल्या भगवान जिरे यांच्या शेत जमिनीजवळ गेल्या वर्षाच्या पावसाळ्यात पोट चारी फुटली होती. ही बाब शेतकऱ्यांनी पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर अवघ्या दोनच दिवसांत जेसीबी उपलब्ध करून देऊन किरण पाटील हे स्वतः कामावर उभे राहून जेसीबी मशीनच्या सहाय्याने पोट चारी दुरुस्त करून घेतली. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलेले आहे. ती पोट चारी दुरुस्त झाल्यामुळे न्याहळोद गावासह कौठळ तामसवाडी या गावातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. याप्रसंगी जिल्हा परिषद माजी कृषी सभापती किरण पाटील, उपसरपंच आप्पा पवार, विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन उमेश पवार, नूतन विद्यालयाचे संचालक भास्कर माळी, विशाल रायते, अमित जैन, अल्ताफ खाटीक, मिलिंद भावसार, भैय्या चौधरी, सचिन भावसार, रायते सर, भरत शिरसाठ, भैय्या माळी, विजय माळी, सोनू माळी, पंकज पाटील, अमृत पवार राजेंद्र काकडदे, राजू भावसार, गणेश चौधरी, पंडित भावसार, उमेश पवार, बापू पाटील, नारायण पाटील, छोटू चौधरी, प्रकाश वाघ, योगेश जैन आदी उपस्थित होते.