प्रकाशा बुराई संघर्ष समितीतर्फे धावड्यात रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 11:40 IST2017-12-08T11:36:35+5:302017-12-08T11:40:33+5:30
उपसा सिंचन योजनांच्या कामांना गती मिळण्याच्या मागणीसाठी केले आंदोलन

प्रकाशा बुराई संघर्ष समितीतर्फे धावड्यात रास्ता रोको
आॅनलाईन लोकमत
धुळे, दि. ८ : प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजनेच्या कामास गती मिळावी, याकरिता संघर्ष समितीच्या वतीने शिंदखेडा तालुक्यातील धावडे येथील नंदुरबार रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आला़ पदाधिकाºयांसह ग्रामस्थ एकवटले होते़ रस्त्यावरच शेतकºयांनी ठिय्या मांडला होता़
या आंदोलनात शिंदखेडा पंचायत समितीचे सदस्य सतीश पाटील, मनोहर देवरे, नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकील पाटील, दोंडाईचा बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठलसिंग गिरासे, शिंदखेडा पंचायत समितीचे माजी उपसभापती रामसिंग गिरासे, झिरवेचे सरपंच राजेंद्र पाटील, गोकूळ पाटील, राहुल पाटील, निंबा पाटील, देवमन पाटील, काशिनाथ पाटील, धावडेचे माजी सरपंच आनंदा पाटील, भुरा पाटील, कांतीलाल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, वैंदाण्याचे माजी सरपंच भरत पाटील, वि.का. सोसायटीचे चेअरमन व्ही़ के़ पाटील, ग्रामपंचायत सदस्य भगवान पाटील, हिम्मत पाटील, जोगशेलूचे सरपंच नितीन देसले, अंजनविहिरेचे उपसरपंच अभय पाटील, वि. का. सोसायटीचे चेअरमन प्रभाकर पाटील, न्याहलीचे सरपंच रमेश पाटील आदींची उपस्थिती होती़
सन २००० पासून मंजूर असलेल्या प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजना सध्या कासव गतीने सुरू आहे़ १०० कोटींची योजना आता ५०० कोटींवर जाऊन पोहचली आहे़
ही योजना चार टप्प्यात असून पहिला टप्पाही अद्याप पूर्ण झालेला नाही़ वर्षानुवर्ष दुष्काळाच्या छायेत असणारे या भागातील प्रकल्प कोरडे ठाक आहेत़ संघर्ष समितीने लाभदायक क्षेत्रात येणाºया गावात शेतकºयांच्या बैठका घेऊन जनआंदोलन उभे केले़ त्याचे रूपांतर रास्ता रोकोत झाले आहे़ गुरुवारी सकाळी ९ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ या वेळी दोनही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती़