बियाणे, खतांची दरवाढ थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:37 IST2021-05-18T04:37:06+5:302021-05-18T04:37:06+5:30
धुळे : रासायनिक खतांचे भाव कमी करावेत अन्यथा, केंद्र सरकारने तीन वर्षांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी करार स्वरुपाने घ्याव्या आणि नफ्याची ...

बियाणे, खतांची दरवाढ थांबवा
धुळे : रासायनिक खतांचे भाव कमी करावेत अन्यथा, केंद्र सरकारने तीन वर्षांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी करार स्वरुपाने घ्याव्या आणि नफ्याची शेती करुन दाखवावी, असे आव्हान धुळे जिल्ह्यातील कृषीकन्यांनी शासनाला दिले आहे.
धुळे येथील कृषीकन्या प्रियंका जोशी, अर्चना अहिरे, अलका खैरनार, कल्पना खैरनार, अंजिराबाई खैरनार, सुनंदा खैरनार, दीपक खैरनार, नरेंद्र खैरनार आदींच्या शिष्टमंडळाने साेमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीआधी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु वास्तवात पिकांचे भाव दुप्पटीने कमी झाले आहेत. याऊलट रासायनि खतांचे भाव दुप्पटीने वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्या तिप्पटीने वाढतील की काय अशी परिस`थिती सरकारने निर्माण केली आहे. कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांनी जीडीपी वाढवला. संपूर्ण जग बंद असताना देशाला शेतकऱ्यांनी जगवले. त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर`थिक मदत केली पाहिजे. शिवाय खरीप हंगामात खते आणि बियाणे मोफत देवून दुप्पटीने मदत करायला हवी. केंद्र सरकारने खतांचे भाव दीडपट वाढवले आहेत.
नोटबंदी, कांदा निर्यातबंदी, कोरोना, सततची गारपीट आणि अवकाळी वादळी पाऊस या साऱ्या संकटांमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खतांचे भाव वाढवले तसे पिकांना हमीभाव देण्यासाठी सरकार ठोस पाऊले कधी उचलणार असा प्रश्न निवेदनात उपस`थित केला आहे. सरकारने खतांचे भाव त्वरीत कमी करावे. ते करणे शक्य नसेल तर केंद्र सरकारने स्वत: शेती करुन नफा मिळवून दाखवावा. सरकारला हे जमले तर त्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी बक्षिस म्हणून स्वत:कडे ठेवाव्यात असे अव्हाने कृषीकन्यांनी दिले आहे.