धुळे जिल्ह्यातील आदिवासी भिल्ल समाजावर होणारा अन्याय थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 14:49 IST2019-02-05T14:48:33+5:302019-02-05T14:49:55+5:30

भिल्ल समाज विकास मंचची मागणी, जिल्हाधिकाºयांना दिले निवेदन

Stop the injustice done on Adivasi Bhill community in Dhule district | धुळे जिल्ह्यातील आदिवासी भिल्ल समाजावर होणारा अन्याय थांबवा

धुळे जिल्ह्यातील आदिवासी भिल्ल समाजावर होणारा अन्याय थांबवा

ठळक मुद्देघोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणलाशिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाºयांची भेटविविध विषयांवर केली चर्चा

आॅनलाइन लोकमत
धुळे :लामकानी परिसरात आदिवासी भिल्ल समाजाच्या नागरिकांवर दारूबंदीच्या नावाखाली कारवाई करून त्यांना वेठीस ठरली जात आहे. आदिवासी भिल्ल समाजावर होत असलेला अन्याय थांबविण्यात यावा अशी मागणी भिल्ल समाज विकास मंचने जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे की, गावातील काही किराणा दुकान, सोडा लॉरी या ठिकाणी देशी-विदेशी दारूची विक्री होत असते. गावातील काही सभ्य नागरीक अवैध व्यवसाय करतात, त्यांना गावातीलच इतरजण पाठबळ देतात. मात्र गरीब आदिवासी भिल्ल समाजाबाबत भेदभाव करण्यात येत आहे. गावातील सर्व प्रकारचे बेकायदेशीर व्यवसाय संपुष्टात आणले पाहिजे.
गावात सट्टा, पत्ते, रासायनिकयुक्त ताडी बनविणे, वाळु तस्करी, आदी अवैध व्यवसाय सुरू असून ते पुर्णपणे बंद करण्यात यावेत. 
धुळे जिल्हा हा कायम दुष्काळी आहे. मजुरांच्या कामाला हात नाही. बरेच आदिवासी भिल्ल हे आपल्या कुटुंबासमवेत परराज्यात ऊस तोडणीसाठी जातात. असे असतांनाही आदिवासी भिल्ल समाजाच्या नागरीकांवर  पोलिसांवर दबाव आणून राजकीयदृट्या कारवाई केली जाते. 
या समाजास राजकीय द्वेषापोटी जीवन जगण्यास भाग पाडत असाल, तर समाजातील प्रत्येक भूमिहीन कुटुंबास शासनाच्या अखत्यारीत असलेल्या शेतजमीनीपैकी प्रत्येकी ३ एकर शेतजमीन मिळावी अशी मागणी करण्यात आली. 
यावेळी समाजबांधवांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना देण्यात आले. 


 

Web Title: Stop the injustice done on Adivasi Bhill community in Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.