१ जानेवारीपासून बेमुदत काम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 22:32 IST2018-12-14T22:31:55+5:302018-12-14T22:32:31+5:30
शिरपूर : नगरपालिका कर्मचाºयांचे निवेदन

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : राज्यातील नगरपरिषद कर्मचारी प्रलंबित मागण्यांसाठी १ जानेवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचे निवेदन संघटनेतर्फे येथील नगरपालिका मुख्याधिकारी अमोल बागुल यांना निवेदन देण्यात आले़
महाराष्ट्र राज्य नगरपालिका, नगरपंचायती, मुख्याधिकारी, कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटना, संघर्ष समिती यांचे संयुक्त विद्यमाने हे निवेदन मुख्याधिकारी अमोल बागुल यांना देण्यात आले.
त्यात संघटनेच्या विविध मागण्यासाठी राज्यातील नगरपालिका कर्मचारी १५ डिसेंबरपासून धरणे आंदोलन करणार आहे. तर २९ ते ३१ डिसेंबर रोजी काळ्या फिती लावून आंदोलन केले करणार आहे. तसेच १ जानेवारीपासून कामबंद आंदोलन पुकारणार असल्याची माहिती निवेदनात देण्यात आली.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी माधव पाटील, संजय हासवाणी, भाईदास भोई, सागर कुलकर्णी, कमलेश जैन, जगदिश बारी, जडीये आदी उपस्थित होते़