दहिवदजवळ वाहनावर लुटारूंकडून दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:44 IST2021-09-16T04:44:55+5:302021-09-16T04:44:55+5:30
१५ रोजी पहाटे साडे तीन ते चार वाजेच्या दरम्यान दहिवद फाट्याजवळील मुंबई-आग्रा महामार्ग लगत असलेला स्वामी समर्थ पेट्रोल ...

दहिवदजवळ वाहनावर लुटारूंकडून दगडफेक
१५ रोजी पहाटे साडे तीन ते चार वाजेच्या दरम्यान दहिवद फाट्याजवळील मुंबई-आग्रा महामार्ग लगत असलेला स्वामी समर्थ पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली़ इंदूरकडून धुळ्याकडे जाणारी गाडी क्रमांक एम़ एच़ ०४-जेके-८३१२ ही पंपाजवळ उभी करीत असताना अज्ञात ४ युवकांनी गाडी अडवून लुटण्याचा प्रयत्न केला़ पैसे न दिल्यामुळे लुटारूंनी गाडीच्या काचा फोडल्यात़ या झटापटीत लुटारूंनी चालकाला चाकू मारून जखमी केले़
लुटारू पुन्हा मारतील या भीतीने चालक राजेश चौहान व सहचालक प्रेमजित चौहान हे दोघे पेट्रोल पंपाच्या केबिनकडे निघालेत़ मात्र केबिन आतून दरवाजा बंद असल्यामुळे त्यांनी उघडण्यास सांगितले़ परंतु पंपावरील कर्मचा-यांना दरोडेखोर असतील म्हणून त्यांनी दरवाजा उघडला नाही़ अखेर चालक व सहचालकाने केबिनचा काचा फोडून दरवाजा उघडा अशी हाक देत विनविण्या केल्यात मात्र शेवटपर्यंत दरवाजा त्या कर्मचा-यांनी उघडला नाही़ लुटारू हे २५ ते ३० वयोगटातील असून त्यांनी तोंडाला रूमाल व अंगात बनियन घातलेला होता़
त्यानंतर घटनेची माहिती थाळनेर पोलिसांना देण्यात आली़ माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक उमेश बोरसे हे पोलिस कर्मचाऱ्यासह दाखल झालेत़ त्यापूर्वीच लुटारू पसार झाले होते, त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करूनही असफल ठरला़ याबाबत थाळनेर पोलिसात चालकाने तक्रार दाखल केली आहे़