आमदार अनिल गोटे यांच्या वाहनावर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 23:06 IST2018-12-08T23:03:59+5:302018-12-08T23:06:06+5:30
पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी घटनास्थळी भेट

आमदार अनिल गोटे यांच्या वाहनावर दगडफेक
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : आमदार अनिल गोटे यांच्या वाहनावर शनिवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास कल्याण भवन जवळ दोन जणांनी दुचाकीवरून येऊन दगडफेक केली़ या घटनेत वाहनाचे पुढील काच फुटले़
आमदार अनिल गोटे हे कल्याण भवन येथे उपस्थित असतांना त्यांचे वाहन क्रमांक एमएच १८ एजे ३३६६ हे चालक साजिद खान कल्याण भवन परिसरातील बाहेर काढत असतांना दोन जण दुचाकीवर आले व त्यांनी समोरून चालकाशेजारील बाजूला काचावर दगडफेक केली व काही क्षणात ते फरार झाले़ या घटनेनंतर पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी घटनास्थळी भेट दिली़ आमदार गोटे यांच्या समर्थकांकडून भाजपच्या नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़