सोनगीर येथे निवृत्त मुख्याध्यापकाकडे चोरी

By Admin | Updated: June 13, 2017 12:26 IST2017-06-13T12:26:36+5:302017-06-13T12:26:36+5:30

घरफोडीत रोख रक्कमेसह सव्वा लाखांचा ऐवज, दुचाकीही लंपास

Steal near the retired Principal at Sonagir | सोनगीर येथे निवृत्त मुख्याध्यापकाकडे चोरी

सोनगीर येथे निवृत्त मुख्याध्यापकाकडे चोरी

ऑनलाईन लोकमत

सोनगीर,दि.13 : येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक लोटन अहिरराव यांच्या बंद घरातून चोरटय़ांनी रोख रक्कमेसह 1 लाख 17 हजारांचे दागिने व कंम्पाऊंडमध्ये लावलेली दुचाकी चोरून नेल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली़  
बालाजी नगरातील प्लॉट क्रमांक 57 मध्ये राहणारे एन. जी. बागूल कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक लोटन जगन्नाथ अहिरराव हे  शिरपूरला रविवारी सकाळी 9 वाजता प}ीसह शिरपूरला नातेवाईकांकडे गेले होते. ही संधी साधत अज्ञात चोरटय़ांनी सोमवारी मध्यरात्री 2़30 ते पहाटे 6 वाजेदरम्यान त्याच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला़ घरातील कपाटातून रोख 55 हजार, आणि सोन्या चांदीचे दागिने आणि घरासमोर लावलेची 15 हजार रूपये किंमतीची दुचाकी (एम एच 18, एजी 4215) असा एकूण 1 लाख 17 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला.   

Web Title: Steal near the retired Principal at Sonagir