पुतळा अनावरण, अभिवादन, शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 14:59 IST2020-02-22T14:58:58+5:302020-02-22T14:59:38+5:30
वीर एकलव्य जयंती जल्लोषात : जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : वीर एकलव्य जयंतीनिमित्त जिल्हाभरात अभिवादन, पालखी मिरवणुकीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
नेर येथे पुतळा अनावरण
नेर- धुळे तालुक्यातील नेर येथे गावातील रायवट भिलाटी परिसरात वीर एकलव्य यांच्या पुतळ्याचे अनावरण जि.प. सदस्य राम भदाणे, सरपंच शंकरराव खलाणे यांच्याहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी गणेश जयस्वाल, धर्मा देवरे, डॉ.सतीष बोढरे, देविदास माळी, दिलीप कोळी, मांगू मोरे, मुन्नीबाई मोरे, अंजनाबाई मोरे, वामन मोरे, दिपक मोरे, बाबुलाल भिल, वसंत बोरसे, जितेंद्र कोळी, आनंद पाटील, योगेश गवळे, रवि वाघ, दिपक भिल, महेश जयस्वाल, माकेश बोढरे यांच्यासह आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी ५ वाजता वीर एकलव्य यांच्या प्रतिमेची गावातून शोभायात्रा काढण्यात आली.
रायवट भिलाटी, कोळी गल्ली, महात्मा फुले चौक, खोलगल्ली, भोई गल्ली, माळी गल्ली, मेनरोड आदी भागातून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. रात्री उशीरापर्यंत ही मिरवणुक सुरु होती.
कापडणे येथे शोभायात्रा
कापडणे- धुळे तालुक्यातील कापडणे येथे वीर एकलव्य यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील, वीर एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश सोनवणे, अॅड.राजन वाघ, दीपक मोरे, शाखाध्यक्ष जितेंद्र भिल, गुड्डा भिल, सुरेश भिल, दीपक पवार, पिंटू भिल, जीवन पवार, अनिल भिल, काशिनाथ भिल, मंगेश भिल, सोनू भिल, सुहाग भिल, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदू भिल, ग्रामपंचायत सदस्य कोकीळाबाई भिल, पिंटू मांडळकर, कैलास भिल, किरण भिल, मंगेश भिल, अनिल मोरे, दीपक पवार, सुभाष भिल, सुनील भिल, अंबर भील यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी गावातून दुचाकी रॅली काढण्यात आली. याप्रसंगी घोषणांनी परिसर दुमदुमला होता. सायंकाळी ६ वाजता श्री महामहेश्वर मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली. रात्री उशीरापर्यंतय मिरवणूक सुरु होती.
खोकरहट्टी जि.प. शाळेत उपक्रम
कापडणे- खोकरहट्टी जिल्हा परिषद शाळा क्रमांक ५ मध्ये वीर एकलव्य जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. माजी ग्रामपंचायत सदस्य काशीनाथ भिल यांच्याहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश भिल, समाधान भिल, राजेंद्र भिल यांच्यासह पालक उपस्थित होते. त्यानंतर वीर एकलव्य प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी विद्यार्थी चेतन भिल याने वीर एकलव्य यांचा सजीव देखावा सादर केला. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर केले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक कमल पाटील, शिक्षक योगेश पाटील यांनी परिश्रम घेतले.
धुळे शहरात विविध कार्यक्रम
वीर एकलव्य जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लेनिन चौकात वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. वीर एकलव्य जयंतीनिमित्त दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध मान्यवरांनी वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले.