जिल्हा रुग्णालयाच्या कोपऱ्यावर शिवसेनाप्रमुखांचा पुतळा उभारावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:46 IST2021-02-05T08:46:23+5:302021-02-05T08:46:23+5:30
धुळे : शहरातील संतोषी माता चौकासमोरील जिल्हा रुग्णालयाच्या कोपऱ्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, या मागणीसाठी ...

जिल्हा रुग्णालयाच्या कोपऱ्यावर शिवसेनाप्रमुखांचा पुतळा उभारावा
धुळे : शहरातील संतोषी माता चौकासमोरील जिल्हा रुग्णालयाच्या कोपऱ्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, या मागणीसाठी मोगलाईतील राजीनामा मित्रमंडळातर्फे महापौर चंद्रकांत सोनार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी भिलेश खेडकर, ज्ञानेश्वर चव्हाण, संदीप शिंदे, बन्सी वाडिले, संतोष कानडे, राजू कोळी, सुकदेव सामुद्रे, पोपट मोरे, नितीन कुंभारे, प्रकाश चव्हाण, सुनील पाटील, ज्ञानेश्वर जाधव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य महाराष्ट्रालाच नव्हे तर जगाला परिचित आहे. पुतळ्याच्या कामासाठी यापूर्वीही पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच महापालिकेच्या महासभेत याविषयीचा ठराव मंजूर झाला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण करण्याची शिकवण दिली. भावी पिढीला त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, यासाठी शहरातील संतोषी माता चौकासमोर जिल्हा रुग्णालयाच्या कोपऱ्यावर त्यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महापालिकेच्या महासभेतही याविषयीचा ठराव मंजूर झाला आहे.