धुळे येथे मंदिर बचाव कृती समितीच्यावचीने आमदार अनिल गोटे यांच्या प्रतिकात्मक पुतळ््याची अंत्ययात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 13:48 IST2018-05-24T13:48:48+5:302018-05-24T13:48:48+5:30

Statue of MLA Anil Gote of the Temple Rescue | धुळे येथे मंदिर बचाव कृती समितीच्यावचीने आमदार अनिल गोटे यांच्या प्रतिकात्मक पुतळ््याची अंत्ययात्रा

धुळे येथे मंदिर बचाव कृती समितीच्यावचीने आमदार अनिल गोटे यांच्या प्रतिकात्मक पुतळ््याची अंत्ययात्रा

आॅनलाइन लोकमत
धुळे, दि. २४ - धुळे शहरातील शिवाजी रोडवरील कालिंका माता मंदिरावर शुक्रवारी कारवाई होणार असल्याच्या हालचाली सुरू असल्याने त्याच्या निषेधार्थ मंदिर बचाव समितीच्यावतीने गुरुवारी आमदार अनिल गोटे यांच्या प्रतिकात्मक पुतळ््याची अंत्ययात्रा काढून महापालिकेसमोर पुतळ््याचे दहन केले.
शहरातील हे मंदिर हटविण्याबाबत हालचाली सुरू असल्याने त्यास मंदिर बचाव समितीचा विरोध आहे. मंदिरावर शुक्रवारी कारवाई होणार असल्याची कुणकूण लागताच शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आमदार गोटे यांच्या प्रतिकात्मक पुतळ््याची भगव्या चौकापासून अंत्ययात्रा काढली. ती मनपा समोर पोहचल्यानंतर तेथे पुतळ््याचे दहन करण्यात आले. या वेळी तृतीयपंथीयदेखील सहभागी झाले होते.

Web Title: Statue of MLA Anil Gote of the Temple Rescue

टॅग्स :Dhuleधुळे