एसटी कामगारांचे राज्यव्यापी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 21:25 IST2020-07-02T21:25:26+5:302020-07-02T21:25:46+5:30
लॉकडाऊनमुळे एसटीचे नुकसान : कामगारांचे ५० टक्के वेतन कापले

dhule
धुळे : कोरोना संसर्ग आणि लॉकडॉनमुळे एसटीची बससेवा ठप्प असल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली आहे़ त्यामुळे एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आर्थिक मदत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी एसटी वर्कर्स काँग्रेसतर्फे (इंटक) १ जुलै रोजी राज्यभर ‘एसटी बचाव, कामगार बचाव’ आंदोलन केले़
धुळ्यातही जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसिल कार्यालयासमोर निदर्शने करुन प्रशासनाला निवेदन देण्यात आले़
मागण्या अशा: कारोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी एक हजार कोटी रुपये अनुदान द्यावे, एसटी कामगारांचे मे महिन्याचे उर्वरीत ५० टक्के वेतन त्वरीत अदा करावे, जून आणि जुलैचे वेतन निर्धारीत तारखेला द्यावे, एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाºयांप्रमाणे वेतन द्यावे, देशातील इतर राज्यांप्रमाणे १७.५ ऐवजी ७ टक्के प्रवासी कर आकारावा, राज्यातील सर्व टोल टॅक्स माफ करावे, मोटार वाहन कर माफ करावा, डिझेलवरील कर माफ करावा, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर माफ करण्यासंदर्भात आदेश पारित करावे, वस्तु व सेवा करात सुट द्यावी, परिवर्तन बस खरेदीसाठी शासनाने अर्थसहाय्य करावे, एसटी महामंडळास आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उपाययोजना कराव्या, खाजगी कंत्राटे रद्द करावी, मागील चार वर्षात झालेल्या कामाच्या खर्चाची श्वेतपत्रिका काढावी कंत्राटी अधिकाºयांची नियुक्ती रद्द करुन त्यांनी घेतलेल्या निर्णयाची उच्चस्तरीय चौकशी करुन कायदेशिर कारवाई करावी आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत़
राज्यातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, विविध सवलतीधारक प्रवासी आणि सर्वसामान्य जनतेला वाहतुकीची दर्जेदार सेवा देण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करावी़ त्यासाठी एसटी महामंडळाला अर्थसहाय्य करावे, अशी मागणी करण्यात आली आहे़
धुळ्यातील आंदोलनात इंटकचे विभागीय अध्यक्ष रामेश्वर चत्रे, विभागीय सचिव चंद्रकांत गोसावी, राज्य सहसचिव एस़ के़ ठाकरे, विभागीय कार्याध्यक्ष विकास गवळी, खजीनदार अनिल पाटील, डेपो अध्यक्ष राजेंद्र खैरनार, डेपो सचिव महेंद्र बहादुर्गे, विभागीय उपाध्यक्ष ललित पाटील, रवी नाजने, उमेश पाटील आदींनी सहभाग घेतला़
एसटी कामगारांच्या वेतनात कपात
लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाचे दररोज २२ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडत असून आतापर्यंत २१०० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे़ त्यामुळे एसटी कामगारांना मे महिन्याचे केवळ ५० टक्के वेतन अदा करण्यात आले़ त्यामुळे विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड, सरचिटणीस मुकेश तिगोटे यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले़ देशातील सर्व राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाºयांना शासकीय कर्मचाºयांप्रमाणे वेतन दिले जाते या मुद्याकडे विशेष लक्ष वेधले आहे़