आरक्षणासाठी धनगर समाजाचा राज्यव्यापी आंदोलनाची इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:42 IST2021-09-10T04:42:55+5:302021-09-10T04:42:55+5:30
धुळे येथे धनगर समाजाची नुकतीच बैठक झाली. अॅड. डांगे म्हणाले की, आरक्षण प्रश्नावर यापुढे धनगर समाजाला सरकार सोबत आरपारची ...

आरक्षणासाठी धनगर समाजाचा राज्यव्यापी आंदोलनाची इशारा
धुळे येथे धनगर समाजाची नुकतीच बैठक झाली. अॅड. डांगे म्हणाले की, आरक्षण प्रश्नावर यापुढे धनगर समाजाला सरकार सोबत आरपारची लढाई लढावी लागेल. आरक्षण ओबीसींच्या विकासाचे मुख्य माध्यम आहे. महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला ३० टक्के आरक्षण नोकरी, शिक्षण व राजकीय क्षेत्रात मिळाले पाहिजे. केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करावी. जातीपाती नष्ट करण्यासाठी जातनिहाय जनगणना नको ही भावना खरी असली तरी सर्व जातींना समान न्याय मिळायलाच हवा, अशी मागणी आहे. आगामी काळात आरक्षणाच्या प्रश्नासाठी महासंघाच्या माध्यमातून राज्यव्यापी लढा उभारण्याचा इशारा त्यांनी दिला.
या वेळी महासंघाचे प्रदेश सरचिटणीस सुनील वाघ, मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे, कर्मचारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. अंकुशराव निर्मळ, सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. अरुण घोडके, अहिल्या महिला संघाच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. अलका गोडे आदी उपस्थित हाेतेे. धनगर समाज महासंघ, मल्हार सेना, कर्मचारी संघटना, अहिल्या महिला संघ व सांस्कृतिक विभागातील राज्य व जिल्हास्तरावर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.