क्रांतीदिनी रंगकर्मींचीही निदर्शने प्रलंबितसह कोरोनाकाळातील मागण्यांचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:40 IST2021-08-12T04:40:54+5:302021-08-12T04:40:54+5:30
रंगकर्मींच्या मागण्या अशा एकपात्री किंवा दोन-तीन कलाकारांच्या मदतीने सादर होणाऱ्या कलांना परवानगी द्यावी, रंगकर्मींच्या मुलांचा शाळेच्या फीचा प्रश्न मार्गी ...

क्रांतीदिनी रंगकर्मींचीही निदर्शने प्रलंबितसह कोरोनाकाळातील मागण्यांचे निवेदन
रंगकर्मींच्या मागण्या अशा
एकपात्री किंवा दोन-तीन कलाकारांच्या मदतीने सादर होणाऱ्या कलांना परवानगी द्यावी, रंगकर्मींच्या मुलांचा शाळेच्या फीचा प्रश्न मार्गी लावावा, घरभाडे वीज बिलात सवलत द्यावी, रंगकर्मी रोजगार हमी योजना राबवावी, रंगकर्मींना दरमहा ५ हजार रुपये निर्वाह भत्ता द्यावा, रंगकर्मींची शासनाकडे नोंद करावी, कलाकार पेन्शन योजनेच्या जाचक अटी शिथिल कराव्यात, मानधनात वाढ करावी, माथाडी कामगारांच्या धर्तीवर रंगकर्मी बोर्डाची स्थापना करावी, मुंबईत कला सादर करण्यासाठी आलेल्या कलावंतांना शासनाचे गाळे सवलतीच्या दरात भाडेतत्त्वावर उपलब्ध करून द्यावेत, प्रत्येक जिल्ह्यात शासकीय विश्रामगृहांमध्ये रंगकर्मींना राहण्याची परवानगी द्यावी, म्हाडा आणि सिडकोच्या राखीव घरांमध्ये ५ टक्के वाढ करावी, निराधार वयोवृद्ध रंगकर्मींची वृद्धाश्रमात प्राधान्याने सोय करावी, सरकारी रुग्णालयांमध्ये रंगकर्मींसाठी बेड राखीव ठेवावेत, आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.