सरकारी कर्मचाऱ्यांचे पंतप्रधानांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 22:10 IST2020-06-04T22:09:44+5:302020-06-04T22:10:02+5:30

विरोध दिन पाळला : कामगार हिताच्या कायद्यातील बदल रोखण्यासाठी एकवटले

Statement of government employees to the Prime Minister | सरकारी कर्मचाऱ्यांचे पंतप्रधानांना निवेदन

dhule

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कामगार हिताच्या कायद्यात बदल करण्यास विरोध दर्शविण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे गुरुवारी निदर्शने करुन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले़
वर्षा पाटील, प्रतिभा घोडके, किशोरी आहिरे, डॉ़ संजय पाटील, अशोक चौधरी, सुधीर पोतदार, शेख मन्सुर, अविनाश मोरे या पदाधिकाºयांच्या शिष्टमंडळाने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांना निवेदन दिले़
निवेदनात म्हटले आहे की, केंद्र तसेच राज्य सरकार कामगार हिताच्या कायद्यांमध्ये बदल करणार आहे़ अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या आवाहनानुसार कामगारांना संरक्षण मिळावे या माणीसाठी चार जूनला अखिल विरोध दिन पाळण्यात आला़ या विरोध दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व विभागातील कर्मचाºयांनी आपआपल्या कार्यालयासमोर दुपारी दोन ते तीन या वेळेत निदर्शने करुन रोष व्यक्त केला़ कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचारी झटत असताना लॉकडाउनचा फायदा घेत कामगार बदल करण्यात येत आहेत़ शासनाच्या या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात कामगार एकवटले आहेत़ वेतन कायदा रद्द करुन वेतन संहिता केली गेल्यामुळे कामगारांना वेळेवर वेतन देण्याचे कायदेशिर बंधन राहणार नाही़ अशा प्रकारचे बदल बºयाच राज्यात सुरू झाले आहेत़ त्यामुळे कामगार वर्गावर गडांतर आले असल्याची प्रतिक्रीया कर्मचारी संघटनेने व्यक्त केली आहे़
जुनी पेन्शन योजना लागु करावी, रिक्त पदांवरील भरतीचे निर्बंध उठवावे, कंत्राटी कामगारांच्या सेवा नियमीत कराव्या, अनुकंपा उमेदवारांना बिनशर्त सेवेत घ्यावे, कोरोनात काम करणाºया सर्व कर्मचाºयांना विमा व प्रोत्साहन भत्ता लागु करावा, कपात केलेले वेतन व महागाई भत्त्याची थकबाकी द्यावी, खाजगीकरण थांबवावे, लॉकडाउन काळातील वेतन द्यावे, गरजूंना रेशन दुकानातून जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करावा, शेतकरी, शेतमजूरांना विशेष मदत द्यावी आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत़

Web Title: Statement of government employees to the Prime Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे