शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

३०० क्विंटल मुळा जातो परराज्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 22:16 IST

कापडण्यात मुळ्याचे १०० बिघा क्षेत्र : रोज रात्री ट्रक्समधून सुरत मार्केटला जातो मुळा

लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे : येथील विविध शेती शिवारात शेतकऱ्यांनी तब्बल ८० ते १०० बिघा शेती क्षेत्रफळात मुळा पिकाची लागवड केली असून सध्या दहा रुपये किलो दराने होलसेल भावात शेतकºयांच्या मुळा पिकाची सुरत येथील सरदार मार्केटला विक्री होत आहे. सध्या खर्च वजा जाता ५० हजार रुपयांचे उत्पादन शेतकºयांना मिळत आहे. साधारण ३०० क्विंटल मुळा परराज्यात विक्रीला जात असतो.मुळाचे पीक कमी कालावधीत तयार होणारे असल्यामुळे त्याची चांगली काळजी घेतल्यास, चांगला भाव मिळाल्यास उत्पादन भरभरून निघत असते.कापडणे गावाच्या भवानी चौकातून दररोज रात्री नऊ वाजेनंतर सुरत येथील सरदार मार्केटला ट्रकमधून ३०० क्विंटलच्याही पुढे मुळा पिक विक्रीला जात असतो. शेतकºयाला मुळा पिक विक्रीला घेऊन जाण्यासाठी प्रत्येक किलोमागे दोन रुपये प्रमाणे गाडी भाडे द्यावे लागत असते.कापडणे गावात जवळपास ८० ते १०० बिघा शेतजमिनीत शेतकºयांनी पाण्याच्या सोयी नुसार व क्षेत्रफळाच्या सोयीनुसार मुळा पिकाची लागवड केली आहे. मुळा पीक हे जरी बारमाही येणारे पीक असले तरी ते खास करून रब्बी हंगामात सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यात लागवड केल्यास अधिक व चांगले उत्पादनाच्या दृष्टिकोनातून योग्य ठरते. सर्वत्र दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने कमी कालावधीचे पिक येणारे मुळा पिकाची लागवड करण्यासाठी सर्वत्र शेतकरी पसंती देत आहेत. दिवाळीच्या दरम्यान मुळा पिकाला अठरा ते वीस रुपये किलो भाव होता तर आजमितीस दहा रुपये किलो प्रमाणे होलसेल भावात मुळा पिकाची विक्री होत आहे.कापडण्यात मुळा पिकाचे उत्पादन घेत असलेल्या शेतकºयांमध्ये दगाजी बुधा मोरे, सुनील सुरेश माळी, आनंदा लोटन माळी, दगाजी मार्तंड पाटील, राकेश आमदेकर, संतोष माळी, लक्ष्मण पुना माळी, बन्सीलाल सुपडू माळी, राहुल देवीदास पाटील, किशोर बोरसे, आत्माराम बळीराम पाटील, बाबूलाल झिंगा माळी, अशोक शंकर माळी, जयराम माळी, अनिल नथू माळी, रवींद्र बंसीलाल माळी, कैलास पाटील आदी शेतकरी मुळाचे उत्तमरीत्या पीक घेत असतात.

टॅग्स :Dhuleधुळे