शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

धुळे शहरात अखेर उद्यानांच्या कामांना प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 4:27 PM

आयुक्तांनी दिली होती ठेकेदारांना नोटीस, ३० ठिकाणी होणार हरीत क्षेत्र विकास

ठळक मुद्दे- तीन वर्षात शासनाकडून ४ कोटी रूपयांचा निधी- शहरात ३० ठिकाणी होणार हरीत क्षेत्रांचा विकास- ठेकेदारांना नोटीसा बजाविल्यानंतर कामांना सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरात अमृत योजनेंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या हरीत क्षेत्र विकास (उद्यान) कामांसाठी कार्यादेश देण्यात येऊनही कामे सुरू झाली नव्हती़ त्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त दिल्यानंतर आयुक्तांनी ठेकेदारांना नोटीसा बजाविल्या होत्या़ त्यानंतर अखेर उद्यानांच्या कामांना मुहूर्त मिळाला आहे़शहरात अमृत योजनेंतर्गत हरीत क्षेत्र विकसित करण्यासाठी शासनाने ३ वर्षात जवळपास ४ कोटी रूपयांचा निधी मनपाला दिला आहे़ मात्र तिन्ही वर्षात आतापर्यंत एकही काम सुरू करण्यात आले नव्हते़ शासनाने ठरवून दिलेली कालमर्यादा संपुष्टात येत असतांनाही त्याकडे दुर्लक्ष होत होते़ त्याबाबतचे वृत्त लोकमतने ७ फेब्रुवारीला प्रसिध्द केले होते़ त्यानंतर आयुक्त सुधाकर देशमुख यांनी लागलीच ठेकेदारांना नोटीसा बजावून दंडात्मक कारवाईसह काळया यादीत टाकण्याचा इशारा दिला होता़ परंतु अखेर हरीत क्षेत्र विकासाच्या कामांना ठेकेदारांकडून प्रारंभ करण्यात आल्याचे दिसून येत आहे़ तिन्ही वर्षांसाठी मिळालेल्या निधीतून एकूण ३० ठिकाणी उद्यानांची निर्मिती केली जाणार आहे़‘अमृत’ अभियानांतर्गत मनपाला  हरीत क्षेत्र विकासासाठी २०१६-१७ या आर्थिक वर्षात १ कोटी ६८ लाख १५ हजार ५१८ रूपयांचा तर २०१७-१८ साठी २ कोटी ३३ लाख ६१ हजार २७८ रूपयांचा निधी मंजूर आहे़ अमृत अभियानांतर्गत हरीत क्षेत्र विकास केला जाणार असल्याने त्यात केंद्र सरकार ५० टक्के, राज्य शासन २५ टक्के व मनपा हिस्सा २५ टक्के अशी विगतवारी आहे़