निमगुळ येथे रस्ताकामास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:08 IST2019-07-30T12:08:09+5:302019-07-30T12:08:31+5:30
पाच लाखाचा निधी : ग्रामस्थांमध्ये समाधान

रस्ता कामाचे उद्घाटन करताना कामराज निकम. समवेत सरपंच बापू सोनवणे, एस.आर. बागल, गोपीचंद बागल, संदीप सैंदाणे, हरी कुवर आदी.
निमगूळ : शिंदखेडा तालुक्यातील निमगूळ येथील रुपचंद कॉलनी नवा प्लॉट भागात सोमवारी रस्ता कामाचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
या रस्त्याचे कामाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम यांच्या हस्ते करण्यात आले. येथील ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेचे कलमान बागल यांच्या पाठपुराव्याने व पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रयत्नाने या रस्त्यासाठी नागरी सुविधा योजने अंतर्गत पाच लाख रुपयांचा निधीमंजूर झाला आहे. येथील वॉर्ड क्रमांक पाच मधील रुपचंद कॉलनी नवा प्लॉट भागात हा निधी खर्च करण्यात येणार असून या उद्घाटन प्रसंगी सरपंच बापू सोनवणे, एस.आर. बागल, गोपीचंद बागल, संदीप सैंदाणे, हरी कुवर, राजेंद्र साळवे, प्रदीप बागल, किशोर बागल, राजेंद्र बागल, भानुदास बागल, अभिमन शिरसाठ, अनिल फौजी, वना बागल, भटू बागल, संजय बागल, विलास बागल, सिद्धेश्वर बाल आदी वॉर्डाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा रस्ता खराब झाला होता. या रस्त्याचे दुरुस्ती व्हावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार हा रस्ता नवीन होत असल्याने परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.