अहिल्यादेवींच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ सुरु करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:38 IST2021-05-21T04:38:05+5:302021-05-21T04:38:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ सुरु करावे, अशी मागणी मल्हार महासंघाने ...

अहिल्यादेवींच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ सुरु करा
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ सुरु करावे, अशी मागणी मल्हार महासंघाने केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३१ मे रोजी जयंती आहे. हा दिवस महाराष्ट्र शासनाने शासकीय सुट्टी म्हणून जाहीर करावा. अहिल्यादेवींनी समाजात शिक्षणाचा प्रसार केला. त्या देशातील पहिल्या नेत्या होत्या. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन देशाच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २० कलमी कार्यक्रम राबवला. अशा थोर व्यक्तिमत्वाच्या फोटोची शासकीय मुद्रणालयात छपाई करुन सर्व शासकीय कार्यालयांमध्ये फोटो लावावा. तसेच त्यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ सुरु करावे, आदी मागण्या निवेदनातून केल्या आहेत.
या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मल्हार महासंघ महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शोभा मिलिंद बैसाणे, ॲड. संतोष जाधव, वंदना बागुल, पवन अहिरे, ॲड. नीलेश अहिरे, करण जाधव, बापू मोरे, जय थोरात आदींनी निदर्शने केली.