स्थायी समिती सभापतींचा भाऊ पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 22:03 IST2017-09-28T22:02:32+5:302017-09-28T22:03:15+5:30
गुंड गुड्डया खूनप्रकरण : चौकशीसाठी घेतले ताब्यात

स्थायी समिती सभापतींचा भाऊ पोलिसांच्या ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कुख्यात गुंड गुड्डया खून प्रकरणात चौकशीसाठी गुरुवारी विशेष पथकाने महापालिकेचे स्थायी समिती सभापती कैलास चौधरी यांचे बंधु प्रकाश चौधरी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम.रामकुमार यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.
शहरातील पारोळा रोडवर १८ जुलै रोजी सकाळी गोपाल टी हाऊसमध्ये कुख्यात गुंड गुड्डयाचा खून झाला होता. याप्रकरणात १५ संशयित आरोपी अटकेत असून ते सर्व न्यायालयीन कोठडीत आहेत. तर एक संशयित शाम गोयर हा मात्र अद्याप फरार आहे. या प्रकरणाचा तपास शासनाने नियुक्त केलेल्या विशेष पथकातर्फे (एसआयटी) करण्यात येत आहे. या प्रकरणात गुरुवारी सकाळी महापालिकेचे स्थायी समिती सभापती कैलास चौधरी यांचे बंधू प्रकाश चौधरी यांना विशेष पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.