रखडलेली प्रकाशा-बुराई योजना मार्गी लावणार - नाना पटोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:25 IST2021-06-26T04:25:02+5:302021-06-26T04:25:02+5:30
मालपूर, ता शिंदखेडा येथे मालपूर जिल्हा परिषद गटातील काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळावा माजी सरपंच हेमराज पाटील यांच्या शेतावर घेण्यात ...

रखडलेली प्रकाशा-बुराई योजना मार्गी लावणार - नाना पटोले
मालपूर, ता शिंदखेडा येथे मालपूर जिल्हा परिषद गटातील काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळावा माजी सरपंच हेमराज पाटील यांच्या शेतावर घेण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, कार्याध्यक्षा आमदार प्रणीती शिंदे, जिल्हा अध्यक्ष श्यामकांत सनेर, माजी मंत्री हेमंत देशमुख माजी आमदार शरद पाटील मालपूर जिल्हा परिषदेचे गटनेते हेमराज पाटील, आदी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नाना पटोले म्हणाले कि, शेतकऱ्यांच्या पुत्राचे स्वागत तुम्ही प्रत्यक्ष शेतशिवारात केल्याने मला समाधान वाटले. येथील शेतकरी पशुपालकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे. एकिकडे शेतीला लागणारा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे तर दुसरीकडे शेती पिकाचे भाव गडगडले याला केंद्राने तीन कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात आणून शेतकरी विरोधी धोरण अवलंबिले आहे. यामुळे येणाऱ्या काळात यांना धडा शिकवा.
मालपूर येथील धवल दूध डेअरी येथे सर्व प्रथम स्वागत केले. उपस्थित कार्यकर्त्यांनी यावेळी त्यांना विविध समस्यांचे निवेदन दिले. यावेळी मोठ्या संख्येने मालपूर जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच हेमराज पाटील यांनी तर सूत्रसंचालन ॲड. रामकृष्ण धनगर व माजी सरपंच वीरेंद्र गोसावी यांनी केले. आभार जयवंत महाले यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम शेतात घेतल्याचे सांगण्यात आले.