माल वाहतुकीतून एस.टी.ला मिळाले दीड लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 12:15 IST2020-06-20T12:14:47+5:302020-06-20T12:15:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे :कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात परिवहन महामंडळाने मालवाहतुकीस सुरूवात केलेली आहे. धुळे विभागाने १५ दिवसात ...

ST got income of Rs. 1.5 lakhs from freight transport | माल वाहतुकीतून एस.टी.ला मिळाले दीड लाखांचे उत्पन्न

dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात परिवहन महामंडळाने मालवाहतुकीस सुरूवात केलेली आहे. धुळे विभागाने १५ दिवसात २० फेऱ्या करून दीड लाखांचे उत्पन्न मिळविल्याची माहिती विभाग नियंत्रक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
२२ मार्चपासून राज्यातील सार्वजनिक परिवहन सेवा लॉकडाऊन झाल्यामुळे ठप्प झालेली आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीतून मिळणारा महसूल व तूट भरून काढण्यासाठी महामंडळाने माल वाहतुकीचा पर्याय स्वीकारला. एस.टी. महामंडळाने सुरू केलेल्या माल वाहतूक सेवेला व्यावसायिक,उद्योजक यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एस.टी.च्या मालवाहतूक सेवेचा लाभ कृषी उत्पादक, अन्नधान्य, बियाणे, खत, रंग आदी वस्तुंच्या उत्पादकांनी घेतला आहे. धुळे विभागाने १५ दिवसात २० फेºयाद्वारे ३ हजार किलोमीटर चालवून दीड लाखांचे उत्पन्न मिळविलेले आहे.
धुळे विभागाकडे सद्यस्थितीत १२ मालवाहतुकीचे ट्रक उपलब्ध असून, भविष्यात प्रत्येक आगाराला दोन ट्रक देण्याची योजना आहे. नव्याने बांधणी होणाºया ट्रकमध्ये अत्यावश्यक सोईसुविधा असणार आहे. या मालवाहतूक योजनेचा धुळे जिल्ह्यातील निर्यातदार, उद्योजक, भुसार व्यापारी यांनी जास्तीत जास्त लाभव घ्यावा असे आवाहन विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी केले आहे.
दरम्यान संपूर्ण महाराष्टÑात महामंडळाने गेल्या २० दिवसांमध्ये ५५० फेऱ्यांद्वारे २५ लाखांचे उत्पन्न मिळविले असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: ST got income of Rs. 1.5 lakhs from freight transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे