एस.टी.ने शोधून काढला उत्पन्नाचा पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 14:58 IST2020-06-24T14:57:52+5:302020-06-24T14:58:10+5:30
धुळे विभाग : १५ दिवसात दीड लाखांचे उत्पन्न

dhule
अतुल जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : ग्रामीर भागाची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एस.टी.ची चाके लॉकडाऊनमुळे जागेवरच थबकली.त्यामुळे उत्पन्नाचा स्त्रोत बंद झाले. मात्र अशा कठीण परिस्थिततही एस.टी.ने प्रवाशांऐवजी मालवाहतूक सुरू करून उत्पन्नाचा नवीन पर्याय शोधून काढला आहे. परिवहन महामंडळाच्या विश्वासाहर्तमुळेच या उपक्रमालाही आता चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.
प्रवासाची कितीही साधने उपलब्ध झाले तरी आजही अनेकजण प्रवासासाठी एस.टी.लाच प्राधान्य देत असतात. रस्ता तिथे एस.टी.पोहचलेली आहे. त्यामुळे गेल्या ७० वर्षांपासून एस.टी.ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी झालेली आहे. आतापर्यंत अविरत धावणाºया एस.टी.ची चाके मात्र कोरोनामुळे जागेवरच थबकली आहेत.
कोरोनाला हरविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. त्या दिवसांपासून एस.टी. रस्त्याऐवजी आगारातच थांबून आहे.
एस.टी.चे जाळे राज्यात पसरलेले आहे. प्रवाशी वाहतुकीतून एस.टी.ला कोट्यावधी रूपयांचे उत्पन्न मिळत असते. मात्र लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून एस.टी.चे उत्पन्नही ‘लॉक’झालेले आहे. त्यामुळे एस.टी.ची परिस्थिती काहीशी ‘डाऊन’ झालेली आहे.