विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या हस्ते पोलीस कॅन्टीनचा धुळ्यात शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 22:11 IST2020-12-22T22:10:06+5:302020-12-22T22:11:09+5:30
पोलीस कॅन्टिनचे अत्याधुनिक स्वरुपात विस्तारीकरण

विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या हस्ते पोलीस कॅन्टीनचा धुळ्यात शुभारंभ
धुळे - जिल्हा पोलीस दलासाठी सुरु असलेल्या पोलीस कॅन्टिनचे अत्याधुनिक स्वरुपात विस्तारीकरण करण्यात आले आहे़ या कॅन्टिनच्या नुतनीकरणाचा शुभारंभ नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ़ प्रतापराव दिघावकर यांच्या हस्ते करण्यात आला़
यावेळी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, प्रशिक्षणार्थी अधिकारी पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते़
या कॅन्टिनमधून दिवाळीच्या काळात सुमारे ४३ लाखांचा माल विकला गेला़ सोनी कंपनीचा टीव्ही ज्याची किंमत बाजारात ९५ हजार आहे, तो टीव्ही याठिकाणी ६५ हजारात दिला गेला़ इतरही वस्तुंची विक्री झाली़ येथे दर्जेदार आणि उच्च प्रतिचा माल मिळतो़ भविष्यात या कॅन्टिनमधून दुचाकी, चार चाकी मिळणार आहेत़ त्यासाठी कंपनीशी बोलणी सुरु आहे़ मल्टिनॅशनल कंपन्यांचे दर्जेदार उत्पादन येथे २५ ते ३० टक्के सवलतीत मिळणार आहे़ दरम्यान, पोलीस अधीक्षक पंडित आणि अन्य अधिकाऱ्यांच्या संकल्पनेचे डॉ़ दिघावकर यांनी कौतुक केले़