आदिवासींना शिधापत्रिका मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:37 IST2021-09-11T04:37:28+5:302021-09-11T04:37:28+5:30
साक्री तालुक्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत आर्थिक संकटात सापडलेल्या आदिवासी कुटुंबांना प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, धुळे ...

आदिवासींना शिधापत्रिका मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम
साक्री तालुक्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत आर्थिक संकटात सापडलेल्या आदिवासी
कुटुंबांना प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, धुळे यांच्याकडील पत्रान्वये अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना शासनाकडून विनामूल्य नवीन केशरी शिधापत्रिका देणे, दुय्यम शिधापत्रिका देणे, विभक्त शिधापत्रिका देणे, शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करणे, कमी करणे आदी कामांसाठी भरावयाचे शुल्क प्रकल्प अधिकारी, धुळे यांच्याकडून न्यूक्लियस बजेट योजनेतून अदा करण्यात येणार आहे.
तालुक्यातील ज्या आदिवासी कुटुंबांकडे शिधापत्रिका नाही, शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करणे, दुय्यम
शिधापत्रिका काढण्यासाठी ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत विशेष मोहीम तहसील कार्यालय, साक्री व अपर तहसील
कार्यालय, पिंपळनेर येथे राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी आपल्या गावातील स्वस्त
धान्य दुकानदाराकडे आवश्यक कागदपत्र सादर करून पोहोच प्राप्त करुन घ्यावी. नवीन शिधापत्रिकेसाठी
आवश्यक कागदपत्रे (फक्त अनुसूचित जमाती करीता आहे) : शिधापत्रिकेमधील सर्व सदस्यांच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत, उत्पन्नाचा दाखला, वीज बिल, घरपट्टी पावती, नमुना क्रमांक ८ चा उतारा (यापैकी एक), बँक पासबुकाची झेरॉक्स प्रत, घर भाड्याचे असल्यास घरमालकाचे सहमती पत्र, सहमती दिल्यास नमुना क्रमांक ८ चा उतारा जोडावा असे आवाहन साक्रीचे तहसीलदार. चव्हाणके, पिंपळनेरचे अपर तहसीलदार विनायक थवील यांनी केले आहे.