स्नेहसंध्या कार्यक्रमात चिमुकल्यांची धमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 12:44 IST2020-02-09T12:43:19+5:302020-02-09T12:44:14+5:30
शिंदखेडा । संस्कार बहुउद्देशिय संस्था संचलित शाईनिंग स्टार्स स्कूलमध्ये विविध उपक्रम

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : येथील संस्कार बहुउद्देशीय संस्था संचलित शाईनिंग स्टार्स प्री - प्रायमरी स्कुलमध्ये स्नेहसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चिमुकल्यांनी विविध कलाविष्कार सादर करुन उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळविली.
स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर केले. २२ चिमुकल्यांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा करुन इंग्रजी भाषेतून भूमिका सादर केली. उपस्थितांनी चिमुकल्यांच्या कलाविष्काराला उत्स्फूर्त दाद दिली.
बक्षीस वितरण समारंभ नगराध्यक्षा रजनी वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
शाळेत वर्षभरात आयोजित विविध स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविणारे विजेते विद्यार्थी तसेच सहभागी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले.
याप्रसंगी पं.स. सभापती सुरेश देसले, गटनेते अनिल वानखेडे, उपनगराध्यक्ष भिला पाटील, विरोधी पक्षनेते सुनिल चौधरी, गटशिक्षणाधिकारी एफ.के. गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी ए.जी. पवार, केंद्रप्रमुख चुडामण बोरसे, नगरसेवक दिपक चौधरी, मुख्याध्यपिका योजना पवार, व्यापारी असोसिएशचे अध्यक्ष मोहन परदेशी, दिनेश चौधरी, दगा बापू चौधरी, अरुण पाटील, जि.प. शिक्षिका रीना पाटील, रुपाली चौधरी यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव उमेश चौधरी यांनी केले. आभार अध्यक्ष संदीप पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन वर्षा परदेशी यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षिका सुनयना ठाकूर, सोनाली कोळी, काजल राजपूत, प्रियंका परजाने, मोहिनी पवार व दीपाली चौधरी यांनी परिश्रम घेतले.