७५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 22:15 IST2020-06-06T22:14:13+5:302020-06-06T22:15:12+5:30
शिरपूर : कोरडवाहू शेतकऱ्यांना अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : तालुक्यात खरीप हंगामाकरीता १ लाख ४ हजार हेक्टर लागवड क्षेत्रापैकी आतापर्यंत सुमारे ७५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीची कामे आटोपली आहेत़ बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केलेली आहे़
तालुक्यात खरीप हंगाम २०२०-२१ करीता १ लाख ४ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे़ त्यापैकी आतापर्यंत ७५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीची कामे आटोपली आहेत़ अद्यापही कोरडवाहू शेतकरी पेरणीची कामे उशिराने करतांना दिसत आहे़ मात्र, बहुतांश बागायतदार शेतकºयांनी यापूर्वीच पेरणीची कामे पूर्ण केलेली आहेत़
गेल्या आठवड्यापासून वातावरणात बदल झाल्यामुळे शेतकºयांनी मशागतीच्या कामांना वेग आणला होता़ गेल्या खरीप हंगामात १ लाख हेक्टरपैकी ९८ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या ९९ टक्के पेरण्या झाल्या होत्या़ तालुक्यात सर्वाधिक पेरा कापसाचा असतो, त्यानंतर मका असतो़
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाने बांधापर्यंत खत-बियाणे पोहचविली आहेत़ गुलाबी बोंडअळींची साखळी तोडण्यासाठी शासन पातळीवरून शेतकºयांना उशिरा बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गत खरीप हंगामात कापूस लागवड उद्दिष्टापेक्षा अधिक झाली होती़ कापसापाठोपाठ मका ११७५ हेक्टर क्षेत्रावर, सोयाबीन ५६५४, ज्वारी ४५९०, बाजरी ४८११, मुग ४३०१, तुर १८३६, ऊस १२७०, केळी ११३३, पपई १०७०, भुईमूग १०७५, उडीद ४७२, भाजीपाला ३७०, सुर्यफूल ११ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या़
खरिपाच्या पूर्वतयारीची कामे आटोपली असून आता शेतकºयांना पावसाची प्रतीक्षा लागून आहे. तालुक्यात खरिपाच्या हंगामासाठी १ लाख ४ हजार हेक्टर क्षेत्र लागवडी योग्य असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अनिल निकुंभ यांनी दिली.