टाळंबंदीतील विजबील माफ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 21:39 IST2020-08-06T21:39:02+5:302020-08-06T21:39:24+5:30
आमदारांचे शिष्टमंडळ : ऊर्जामंत्र्यांना दिले निवेदन

dhule
धुळे : टाळेबंदीच्या काळात मीटर रिडींग न घेता विज कंपनीने अव्वाच्या सव्वा विज बिले पाठविली़ आधीच आर्थिक संकटात असलेल्या सामान्य वीज ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे अवास्तव आणि अतिरिक्त आकारलेले वीज बिल माफ करुन धुळे जिल्हयातील वीज ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आ. कुणाल पाटील यांच्या शिष्टमंडळाने उजार्मंत्री नितीन राऊत यांची प्रत्यक्ष भेट घेवून केली़
महारष्ट्र वीज वितरण कंपनीने आकारलेल्या अवास्तव आणि जास्तीच्या वीज बिलामुळे धुळे जिल्हा आणि राज्यातील वीज ग्राहक हैराण झाला आहे. त्यामुळे टाळेबंदीच्या काळातील विज बिल माफ करण्याची मागणी आ. कुणाल पाटील यांच्या शिष्टमंडळाने उजार्मंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली. यावेळी आ. अमित झनक, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, राहूल बोंद्रे उपस्थित होते.