लवकरच ऊस खरेदीचा दर वाढवून मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:41 IST2021-07-14T04:41:11+5:302021-07-14T04:41:11+5:30
पियपऊनी अनिरुद्ध लॉन्स येथे ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंपळनेरसह परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी ...

लवकरच ऊस खरेदीचा दर वाढवून मिळणार
पियपऊनी अनिरुद्ध लॉन्स येथे ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंपळनेरसह परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. अनेक वर्षांपासून पिंपळनेर पाट बागायत क्षेत्रामध्ये विविध पिके गटशेतीच्या माध्यमातून घेतली जातात गेल्या काही वर्षांपासून सर्व शेतकरी हे ऊस उत्पादन विक्रमी पद्धतीने घेत आहेत. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी पिंपळनेर येथील शेतकऱ्यांनी १३५ एकरवरील सामूहिक गट शेती ऊस लागवड प्रकल्प पाहणी केली. यावेळी घाडगे क्षेत्रातील शेतकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. द्वारकाधीश साखर कारखान्याचे चेअरमन शंकरराव सावंत यांनी लागवडीसाठी कारखान्याने दिलेले ऊस पीक, संगोपनासाठी बांधावर दिलेली सेवा, खोडवा व्यवस्थापन आदीविषयी माहिती दिली.
प्रास्ताविक शंकराव सावंत यांनी केले. शेतकऱ्यांमधून प्रशांत पाटील यांनी सामुदायिक गट शेतीवर होत असलेले शेती काम शेती उत्पादन आदींची माहिती दिली. कार्यक्रमास सटाणाचे तहसीलदार इंगळे, पिंपळनेर येथील अप्पर तहसीलदार विनायक थविल, साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सचिन सावंत, शेतकी अधिकारी विजय पवार, ऊस विकास अधिकारी माळी, गट सुपरवायझर नितीन कापडणीस, पिंपळनेर ऊस विकास अधिकारी चौरे, गोरख गांगुर्डे, पाट बागायत चेअरमन सुदाम पगारे, प्रशांत पाटील, अरुण निकुंम, डॉ. दिलीप राजपूत, सुनील धायबर, दीपक धायबर, या सहा असंख्य शेतकरी उपस्थित होते.