महिलेच्या गळ्यातून सोनपोत ओरबाडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 12:13 IST2018-12-24T12:12:47+5:302018-12-24T12:13:15+5:30

छत्रपती गार्डनजवळील घटना : ६० हजाराचा ऐवज

The sonpot was squeezed from the neck of the woman | महिलेच्या गळ्यातून सोनपोत ओरबाडली

dhule

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महिलेच्या गळ्यातील सोनपोत ओरबाडून नेल्याची घटना शहरातील जुने जातपडताळणी कार्यालयाजवळ शनिवार २२ रोजी दुपारी घडली़ आझादनगर पोलिसात याप्रकरणी दोघांविरुध्द रात्री गुन्हा दाखल झाला. 
मार्केट यार्ड भागातील शिव कॉलनीत राहणारी कुंदा प्रदीप सोनवणे (५९) ही वृध्द महिला शहरातील जुने जातपडताळणी कार्यालय जवळील छत्रपती गार्डन जवळून जात असताना २५ ते २८ वयोगटातील दोन अनोळखी तरुण भरधाव वेगात दुचाकीने आले़ त्यांनी या महिलेच्या गळ्यातील ४ तोळे वजनाची व ६० हजार रुपये किंमतीची सोनपोत ओरबाडून घेत घटनास्थळावरुन धूम ठोकली.  ही घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली़ या महिलेने आरडाओरड केली़ परंतु दुपारची वेळ असल्याने या भागात कोणीही नव्हते़ परिसरात शोध घेतला असता दोघेही सापडले नाही़ 
त्यानंतर या महिलेने आझादनगर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना ‘आपबिती’ कथन केली़ शनिवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास फिर्याद दिल्यानुसार अनोळखी दोघांविरुध्द भादंवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे़ या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ करीत आहेत़ 

Web Title: The sonpot was squeezed from the neck of the woman

टॅग्स :Dhuleधुळे