गुरांचा ट्रक पकडण्यासाठी सोनगीर पोलिसांचा पाठलाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:42 IST2021-09-14T04:42:44+5:302021-09-14T04:42:44+5:30

सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे, कर्मचारी विशाल सोनवणे, चालक सुरेश तावडे सोमवारी पहाटे १ वाजेच्या ...

Songir police chase to catch cattle truck | गुरांचा ट्रक पकडण्यासाठी सोनगीर पोलिसांचा पाठलाग

गुरांचा ट्रक पकडण्यासाठी सोनगीर पोलिसांचा पाठलाग

सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे, कर्मचारी विशाल सोनवणे, चालक सुरेश तावडे सोमवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास रात्रीच्या गस्तीवर हाेते. शिरपूरहून धुळ्याच्या दिशेने जाणारे एमपी ०९ सीजी ८२७५ क्रमांकाचे वाहन संशयावरून थांबविण्याचा इशारा पाटील यांनी चालकाला दिला. पण, त्याने दुर्लक्ष करून ते वाहन वेगाने पळविले. पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग सुरू केला. पोलीस आपल्या मागावर असल्याचे लक्षात येताच चालकाने वाहन नगावजवळ थांबवून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. पोलीस त्या वाहनाजवळ पोहोचल्यानंतर तपासणी केली असता त्यात ४ गुरे आढळून आली. या वाहनाच्या मागील बाजूस एमपी ०९ सीजे ८२७२ असा आढळून आला. वाहनाच्या मागे आणि पुढे दोन वेगवेगळे नंबर लावण्यात आलेले आहेत. गोरक्षकांची मदत घेऊन या गुरांना गोशाळेत पाठविण्यात आले. सोनगीर पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Songir police chase to catch cattle truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.