गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना सोनगीर पोलिसांनी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 11:40 IST2020-04-05T11:26:30+5:302020-04-05T11:40:32+5:30
वाहनासह दीड लाखाचा मुद्देमाल ताब्यात

गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना सोनगीर पोलिसांनी पकडले
आॅनलाइन लोकमत
धुळे/सोनगीर: गायींना निर्दयपणे कोंबून पिकअप वाहनातून नेणाºया दोन संशयितांना येथील पोलीसांनी पकडले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी पिकअपसह एक लाख ५५ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला़
सोनगीर पोलीस ठाण्याजवळ सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत सूर्यवंशी, हवलदार अजय सोनवणे, पोलीस सदेसिंग चव्हाण, विवेक वाघमोडे बंदोबस्तासाठी उपस्थित होते़ त्याचवेळेस सोनगीरहून धुळ्याकडे जाणारी एमएच ०४ जीसी ९११० क्रमांकाची पिकअप व्हॅन संशयास्पदरित्या जातांना आढळून आली़ हे वाहन पोलिसांनी अडविले़ वाहनात काय आहे, याची विचारणा वाहनचालक जाविद कलीम पिंजारी व शेजारी मोहम्मद अंसारी (दोन्ही राहणार मिल्लतनगर धुळे) यांच्याकडे केली़ त्यावेळेस त्यांच्याकडून उडवा-उडवीची उत्तरे मिळाल्याने पोलिसांचा संशय बळावला़ वाहनाची तपासणी केल्यावर वाहनात पाच गायी व एक वासरु कोंबलेले दिसून आली. गाय व वासरूला कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचे पोलिसांच्या तपासणीतून समोर आले़ जप्त केलेले गायी व वासरुची किंमत ५५ हजार व पिकअप एक लाख असा एकूण १ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.